Duleep Trophy 2023  sakal
क्रीडा

Duleep Trophy 2023 : दुलीप करंडकात दिग्गज खेळाडू आमनेसामने, पृथ्वी-सर्फराझचे काय होणार?

पश्‍चिम आणि दक्षिण विभाग यांच्यामध्ये आजपासून अंतिम झुंज

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : पश्‍चिम विभाग-दक्षिण विभाग यांच्यामध्ये उद्यापासून दुलीप करंडकाचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या क्रिकेटपटूंचा समावेश असल्यामुळे जेतेपदाच्या लढतीत दिग्गज खेळाडूंमधील टक्कर तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.

पश्‍चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतेश्‍वर पुजारासाठी दुलीप करंडकाची अंतिम लढत अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पुजाराला भारतीय संघातून वगळण्यात आले.

आता त्याला अजिंक्य रहाणेप्रमाणेच स्थानिक क्रिकेटमध्ये चमक दाखवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करावे लागणार आहे. त्याने मध्य विभागाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत १३३ धावांची खेळी करीत आपली धमक दाखवून दिली. भारतासाठी १०३ कसोटी खेळणाऱ्या पुजाराला अंतिम लढतीतही मोठ्या खेळीची आशा असेल.

पश्‍चिम विभागाचे वर्चस्व

दुलीप करंडकात आतापर्यंत पश्‍चिम विभागाचे वर्चस्व दिसून आले आहे. पश्‍चिम विभागाने ३४ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला असून १९ वेळा त्यांनी या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली आहे. दुलीप करंडक सर्वाधिक वेळा जिंकण्याची किमयाही त्यांनीच करून दाखवली आहे.

दक्षिण विभागाने १३ वेळा या स्पर्धेच्या अजिंक्यपदाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. त्यांना यंदा १४ व्या जेतेपदाची आस असणार आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पश्‍चिम विभागाने गेल्या वर्षी दक्षिण विभागावर २९४ धावांनी मात करत दुलीप करंडक पटकावला होता. दक्षिण विभागाचा संघ त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी यंदा सर्वस्व पणाला लावताना दिसेल.

पृथ्वी, सर्फराझचे काय होणार?

पृथ्वी शॉ व सर्फराझ खान या दोन मुंबईकरांना यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना ठसा उमटवता आला नाही. त्यामुळे भारतीय संघाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्यात आलेले नाहीत.

टीम इंडियात निवड न झाल्यामुळे क्रिकेट वर्तुळात संमिश्र प्रतिक्रियाही उमटल्या; मात्र आता हे सर्व मागे सारून दोघांनीही स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय संघात प्रवेश मिळवायला हवा. दुलीप करंडकाची अंतिम लढत दोघांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

हनुमा, मयांक, सुंदरवर लक्ष

पश्‍चिम विभागातील संघात स्टार खेळाडूंची मांदियाळी आहे. तशीच दक्षिण विभागीय संघातही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. मयांक अगरवाल याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दोन अर्धशतकी खेळी साकारल्या. हनुमा विहारी २०२२ मध्ये अखेरची आंतरराष्ट्रीय लढत खेळला. बर्मिंगहॅम येथील इंग्लंडविरुद्ध कसोटीत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.

वॉशिंग्टन सुंदर या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळला. सुमार फॉर्म, दुखापत यामुळे तिघांनीही भारतीय संघातील स्थान गमावले. आता तिघांनाही भारतीय संघात प्रवेश करण्याचे वेध लागले असतील. त्यामुळे दुलीप करंडकाची अंतिम लढत त्यांच्यासाठीही मोलाची ठरू शकते.

या खेळाडूंमध्ये क्षमता

स्टार खेळाडूंशिवाय पश्‍चिम व दक्षिण या दोन संघांमध्ये दमदार कामगिरी करण्याची क्षमता असणारे खेळाडूही आहेत. यामध्ये तिलक वर्मा, बी. साई सुदर्शन, आर. साई किशोर, वैशाख विजयकुमार, विदवाथ कावेरप्पा या खेळाडूंमध्येही चमकदार कामगिरी करून भारतीय संघात प्रवेश करण्याची गुणवत्ता आहे.

दुलीप करंडक अंतिम लढत

पश्‍चिम विभाग - दक्षिण विभाग

बंगळूर, सकाळी ९.३० वाजत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT