Duleep Trophy 2023 South Zone Vs West Zone esakal
क्रीडा

Cheteshwar Pujara Suryakumar Yadav : सूर्याला कसोटी काही झेपेना... पुजाराही गेला फेल; 'पश्चिम'ची तगडी फलंदाजी झाली ढेर

अनिरुद्ध संकपाळ

Duleep Trophy 2023 South Zone Vs West Zone : दुलीप ट्रॉफी 2023 च्या अंतिम सामन्या तिसऱ्या दिवशी पश्चिम विभागाची स्टार खेळाडूंचा भरणा असलेली फलंदाजी पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. दक्षिण विभागाने पश्चिम विभागाचा पहिला डाव 146 धावात गुंडाळला. पश्चिम विभागाकडून खेळणारे चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव आणि सर्फराज खान हे तगडे फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाही. दक्षिण विभागाच्या विधवत कावेराप्पाने 53 धावात 7 विकेट्स घेत पश्चिम विभागाच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. (Cheteshwar Pujara News)

दक्षिण विभागाने कर्णधार हनुमा विहारीच्या 63 आणि तिलक वर्माच्या 40 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 213 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पश्चिम विभागाने पृथ्वी शॉच्या 65 धावांच्या जोरावर बरी सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र पश्चिम विभागाची मधील फळी कुचकामी ठरली. त्यामुळे त्यांचा पहिला डाव 146 धावातच संपुष्टात आला. (Suryakumar Yadav Test Cricket)

चेतेश्वर पुजारा 9, सूर्यकुमार यादव 8 तर सर्फराज खान (Sarfaraz Khan) भोपळाही न फोडता माघारी गेला. या तिघांचीही शिकार वेगवान गोलंदाज विधवत कावेराप्पाने केली. दक्षिण विभागाने पहिल्या डावात 67 धावांची आघाडी घेतल्यानंतर आपल्या दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. (Cricket News In Marathi)

दक्षिण विभागाने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस 7 बाद 181 धावा करत आपली आघाडी 248 धावांपर्यंत पोहचवली. दुसऱ्या डावात देखील हनुमा विहारीने 42 धावांची झुंजार खेळी केली. त्याला रिकी भुईने 37 सचिन बेबीने 28 धावांचे योगदान दिले. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर 10 तर विजयकुमार वयशाक 1 धावांवर खेळत होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: आधार अपडेटसाठी नागरिकांची धांदल; ई-केवायसी करण्यासाठी केंद्रांवर लाडक्या बहिणींच्या लागताहेत रांगा

Mumbai News: लिंक रोडसाठी १,०३९ झाडांवर कुऱ्हाड, सर्वोच्च न्यायालयाची मुंबई पालिकेला सशर्त परवानगी

Kolhapur News: ‘मी नाही तर माझा वारस!’ घराणेशाहीचा फटका कार्यकर्त्यांना; ९ नगरपालिकांत नेत्यांच्या कुटुंबीयांचीच उमेदवारी

Latest Marathi Breaking News : हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

Mukesh Ambani : 31,000 कोटींच्या बाजारात मुकेश अंबानी करणार गुंतवणूक! दोन वर्षात बाजार होणार दुप्पट!

SCROLL FOR NEXT