AUS vs PAK esakal
क्रीडा

AUS vs PAK : वांशिक शिवीगाळ? पाकिस्तानच्या सराव सामन्यात ब्रॉडकास्टरनं केली मोठी चूक अन् वादाला फुटलं तोंड...

अनिरुद्ध संकपाळ

AUS vs PAK : पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी संघाची धुरा शान मसूदच्या खांद्यावर आल्यानंतर पाकिस्तानची ही पहिलीच मालिका आहे. सध्या ते कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन संघासोबत सराव सामना खेळत आहे. मात्र बुधवारी या सामन्यावेळी एक वादग्रस्त घटना घडली.

इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफिक फलंदाजी करत असताना सामन्याचे प्रसारण हक्क असलेल्या फॉक्स क्रिकेटने पाकिस्तानचा शॉर्ट फॉर्म PAK असं लिहिण्याऐवजी PAKI असं लिहिलं होतं. यामुळे वाद निर्माण झाला आहे. Paki हा पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी एक अपमानजनक शब्द आहे.

याबाबत ऑस्ट्रेलियन क्रिकेट पत्रकार डॅनी सईद यांनी हा विषय ट्विटरवर उचलून धरला होता. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्कीनवर PAK असं दाखवण्यास सुरूवात केली. त्यानंतर अधिकृत वक्तव्य देखील प्रसिद्ध करण्यात आलं. क्रिकेट ऑस्ट्रेलिया ट्विटरवरील वक्तव्यात म्हणते, 'डाटा पुरवणाऱ्याकडून ग्राफिक हे थेट फिड केलं जात. यापूर्वी पाकिस्तानच्या सामन्यावेळी असं ग्राफिक वापण्यात आलं नव्हत. नक्कीच ही खेदजनक बाब आहे. जेव्हा याबाबत समजलं त्यावेळी ही चूक सुधारण्यात आली आहे.'

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाबाद 156 धावा केल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शान मसूद हा इमाम उल हक 9 धावांवर बाद झाल्यानंतर आला होता. मसूदने संपूर्ण दिवस फलंदाजी करत 13 चौकार आणि एक षटकार मारला. पाकिस्तानने 6 बाद 324 धावा केल्या. सर्फराज अहमदने देखील 41 धावांचे योगदान दिले. बाबर आझमने 40 धावा केल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT