Dutee Chand s challenge to the four-year ban explanation given stimulant taken unintentionally Sakal
क्रीडा

Dutee Chand : द्युतीचंदचे चार वर्षांच्या बंदीला आव्हान

उत्तेजकाचे सेवन अनावधनाने झाल्याचे दिले स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये दोन वेळा रौप्यपदक जिंकणारी भारताची अनुभवी धावपटू द्युती चंद ही उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी सापडल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेकडून तिच्यावर चार वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. द्युतीचंद हिने शुक्रवारी या बंदीच्या शिक्षेला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

द्युतीचंद हिची मागील वर्षी डिसेंबर महिन्यात उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. द्युतीचंदला ५ व २६ डिसेंबरला दोन चाचण्यांना सामोरे जावे लागले. या दोन्ही चाचण्यांमध्ये जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेकडून बंदी टाकण्यात आलेल्या उत्तेजकांचा समावेश होता. त्यामुळे द्युतीचंद हिला बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. या शिक्षेचा कालावधी ३ जानेवारीपासून सुरू झाला.

फिजिओच्या सल्ल्याने औषध

द्युतीचंद हिला कंबरदुखी होती. त्यामुळे तिला ते औषध सेवन करावे लागले. जो फिजियोथेरपिस्ट नित्यनियमाने सल्ला देतो, त्याच फिजियोथेरपिस्टकडून या दुखापतीवर औषधाची मागणी केली, असे पार्थ गोस्वामी यांच्याकडून सांगण्यात आले.

उत्तेजक फायद्यासाठी नव्हे!

या प्रकरणात द्युतीचंद हिच्या बाजूने वकील पार्थ गोस्वामी लढत आहेत. याप्रसंगी ते म्हणाले, द्युतीचंद हिची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द स्वच्छ राहिली आहे. याआधीही ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर असंख्य चाचण्यांना सामोरे गेली आहे.

कधीही तिच्यावर उत्तेजक सेवन केल्याचा आरोप लागला नाही. अनावधनाने सेवन केल्याचे हे प्रकरण आहे. या पदार्थाचा वापर कधीही फायदा मिळवण्यासाठी केला गेला नाही, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

विरोधाभासामुळे चिंता

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेच्या शिस्तपालन समितीसमोर हे प्रकरण आहे. द्युतीचंदने औषध खरेदी करण्यासाठी आपल्या सहकाऱ्याला पाठवले होते. हा सहकारी साक्षीदारही आहे, पण शिस्तपालन समितीसमोर त्याने जे वक्तव्य केले, त्यामधून विरोधाभास जाणवत आहे. त्यामुळे द्युतीचंदची चिंता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT