Earthquake During Ireland U19 vs Zimbabwe U19 Match In U19 World Cup
Earthquake During Ireland U19 vs Zimbabwe U19 Match In U19 World Cup esakal
क्रीडा

Video: U19 वर्ल्डकप सामन्यादरम्यान भुकंपाचे हादरे; सपोर्ट स्टाफची पाचावर धारण

अनिरुद्ध संकपाळ

त्रिनिदाद: सध्या वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षाखालील वर्ल्डकप (ICC U19 World Cup 2022) सुरू आहे. शनिवारी त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क मैदानावर आर्यलंड आणि झिम्बावे (Ireland U19 vs Zimbabwe U19) यांच्यात सामना सुरू होती. या सामन्याच्या पहिल्या डावातील सहा षटके झाल्यानंतर भुकंपाचे हादरे (Earthquake) बसण्यास सुरूवात झाली. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा भुकंप ५.२ मॅग्निट्यूड तीव्रतेचा होता. (Earthquake During Ireland U19 vs Zimbabwe U19 Match In U19 World Cup)

आर्यलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज हमफ्रेस सामन्याचे सहावे षटक टाकत होता. तो षटकातील पाचवा चेंडू टाकत असतानाच भुकंपाचे हादरे बसण्यास सुरूवात झाली. खेळाडूंना याची कोणतीही जाणीव नव्हती. मात्र कॉमेंटरी बॉक्समध्ये या भुकंपाचे हादरे लगेचच जाणवू लागले. बॉक्समधील टीव्ही स्क्रीनला मोठे हादरे बसत होते. कॉमेंटेटर अँड्र्यु लिओनाड (Andrew Leonard) यांनी कॉमेंटरी करत असतानाच भुकंप झाल्याचे सांगितले.

ते म्हणाले 'जवळपास १५ ते २० सेकंद मोठे हादरे बसत होते. मात्र आता मीडिया सेंटर (Media Centre) पडणार की नाही असे काही वाटले नाही. फक्त ते आमच्या नियंत्रणात नव्हते. ते हादरे थांबवणे नियंत्रणात नसल्याने त कधी थांबणार असे वाटत होते. काही वेळानंतर हादरे तीव्र झाले. हा छोटा मात्र घाबरवणारा अनुभव होता.'

दरम्यान, मैदानावर या भुकंपाची जाणीव कोणत्याच खेळाडूला झाली नाही. मात्र आर्यलंडच्या सपोर्ट स्टाफला भुकंपानंतर सामना कसा सूरू राहिला याचे आश्चर्य वाटत होते. याबाबत कॉमेंटेटर अँड्र्यु लिओनाड म्हणाले की, 'आर्यलंडचा सपोर्ट स्टाफ आणि कोच पॅव्हेलियनमध्ये होते. त्यांना विश्वासच बसला नाही की भुकंपाच्या हादऱ्यावेळी देखील सामना सुरू होता. ते मैदानापासून दूर होते. त्यांना हा भुकंप आहे याची लगेचच जाणीव झाली. आर्यलंडचा स्टाफ मैदानात जाण्यासाठी तयारच होता. मात्र भुकंपाचे हादरे २० सेकंद बसले. मात्र ते हादरे चांगलेच तीव्र होते.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT