Paris Olympic 2024 sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : 'या' खेळाडूच्या जिद्दीला सलाम!! सात महिन्यांची गर्भवती तलवारबाज ऑलिम्पिकमध्ये झाली सहभागी अन्...

ऑलिंपिकसाठी पात्र ठरून आपली गुणवत्ता सादर करण्याकरिता वयाचे बंधन नाही; पण पॅरिस ऑलिंपिक त्याही पलीकडे गेले आहे. इजिप्तची नादा हफिझ ही सात महिन्यांची गर्भवती सोमवारी झालेल्या महिला तलवारबाजी स्पर्धेत खेळली.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस : ऑलिंपिकसाठी पात्र ठरून आपली गुणवत्ता सादर करण्याकरिता वयाचे बंधन नाही; पण पॅरिस ऑलिंपिक त्याही पलीकडे गेले आहे. इजिप्तची नादा हफिझ ही सात महिन्यांची गर्भवती सोमवारी झालेल्या महिला तलवारबाजी स्पर्धेत खेळली.

२६ वर्षीय नादा हफिझ ही वैयक्तिक सब्रे गटात सहभागी झाली; परंतु ती पराभूत झाली. ‘‘सोमवारी मी व्यासपीठावर आले तेव्हा आम्ही तिघे तेथे होतो. मी, माझी प्रतिस्पर्धी आणि अजून या विश्वास येण्याच्या प्रतीक्षेत असलेले माझे मूल...’’ अशी माहिती स्वतः हफिझने सोशल मीडियावरून प्रसिद्ध केली.

हफिझ ही इजिप्तची राजधानी कैरोतील रहिवासी आहे आणि हे तिचे तिसरे ऑलिंपिक आहे. माझ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ऑलिंपिकमध्ये खेळणे हे प्रतिष्ठेचे आहे, अशी भावना हफिझने व्यक्त केली.

हफिझने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या एलिझाबेथ तार्ताकोवस्की हिचा १५-१३ असा पराभव शानदार सुरुवात केली होती; परंतु पुढच्या फेरीत तिला दक्षिण कोरियाच्या जिऑन ह्याँगकडून पराभव स्वीकारावा लागला. ‘‘या दोन सामन्यांत माझ्यासह माझ्या मुलाचाही शारीरिक आणि मानसिकतेचा तेवढाच वाटा आहे,’’ असे हफिझ म्हणते.

गर्भवती राहणे सोपे नाही. वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो, तसेच हे जीवन आणि खेळ यांच्यातील समतोलपणा साधण्यासाठीही कसरत करावी लागते; पण खेळासाठी हे सर्व सहन करण्यासारखे आहे, असे सांगणाऱ्या हफिझने पती इब्राहिम आणि संपूर्ण कुटुंबाचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेसने निर्माण केला पेच? विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर ठोकला दावा!

५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

SCROLL FOR NEXT