Sachin Tendulkar News sakal
क्रीडा

Sachin Tendulkar : निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरला दिली मोठी जबाबदारी, टक्केवारी वाढवण्याचा करणार प्रयत्न

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठं पाऊलं उचलले आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

२०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुक आयोगाने मतदारांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यासाठी मोठी निर्णय घेतला आहे.

निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरचे बुधवारी निवडणूक आयोगाचे (EC) "नॅशनल आयकॉन" म्हणून नाव देण्यात येणार आहे. तेंडुलकर आणि निवडणूक पॅनल यांच्यात बुधवारी दिल्लीत सामंजस्य करार होणार आहे. तीन वर्षांच्या करारांतर्गत तेंडुलकर मतदारांमध्ये जनजागृती करणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या तयारीसाठी राष्ट्रीय निवडणूक आयोग जोरात काम करत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, "आगामी निवडणुकांमध्ये, विशेषतः सार्वत्रिक निवडणुका (लोकसभा) 2024 मध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी युवकांमधील तेंडुलकरच्या अद्वितीय प्रभावाचा फायदा घेण्याच्या दिशेने हे सहकार्य एक महत्त्वाचे पाऊल असेल."

गेल्या वर्षी आयोगाने अभिनेता पंकज त्रिपाठी यांना नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. यापूर्वी, 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, एमएस धोनी, आमिर खान आणि मेरी कॉम सारख्या दिग्गजांना निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन होण्याचा मान मिळाला होता. आता यावेळी क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि भारतरत्न पुरस्कार विजेता सचिन तेंडुलकरची नॅशनल आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे.

सचिन तेंडुलकर बुधवारी ECI सोबत राष्ट्रीय आयकॉन म्हणून त्याच्या नवीन इनिंगची सुरुवात करेल. या संदर्भात ऑल इंडिया रेडिओ, नवी दिल्ली येथील रंग भवन येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT