Asia Cup sakal
क्रीडा

Asia Cup 2023 : पाककडून विजेतेपदासाठी अतिरिक्त फायदा?

इमर्जिंग म्हणजेच नवोदित खेळाडूंची स्पर्धा असे असले तरी पाकिस्तानने रविवारी संपलेल्या आशिया करंडकाच्या या स्पर्धेत वरिष्ट गटातील तब्बल पाच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खेळवले.

प्रशांत पाटील

कोलंबो - इमर्जिंग म्हणजेच नवोदित खेळाडूंची स्पर्धा असे असले तरी पाकिस्तानने रविवारी संपलेल्या आशिया करंडकाच्या या स्पर्धेत वरिष्ट गटातील तब्बल पाच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खेळवले हीच बाब त्यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे त्यांना विजेतेपद मिळवणे सोपे झाले अशी टीका करण्यात येत आहे.

२०२२ मधील टेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रभाव पाडणारा महम्मद हॅरिस हा या आशिया कप इमर्जिंग स्पर्धेत पाकिस्तानचा कर्णधार होता. तर भारतीय संघातील एकही खेळाडू सीनियर पातळीवर खेळलेला नाही. कोणत्याही परिस्थितीत विजेतेपद मिळवायचे याच उद्देशाने पाकने नवोदितांनाऐवजी अशा सिनियर्सना संघात खेळवले.

पाक संघातील सलामीवीर सईम अयुब आणि साहिबझादा फरहान हे दोघे मिळून ११ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहे. भारताच्या नवोदित संघाविरुद्ध अंतिम सामन्यात कसा दृष्टिकोन ठेवायचे हे त्यांना चांगलेच माहीत होते. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्या चेंडूपासून हल्ला सुरू केला होता.

या अंतिम सामन्यात आक्रमक शतकी खेळी करणारा तय्यब ताहिर हा पाकच्या मुख्य संघातून तीन ट्वेन्टी-२० सामने खेळलेला आहे. परंतु त्याला प्रभाव पाडता आलेला नाही. अफगाणीस्तानविरुद्धच्या त्या मालिकेत पाकचा पराभवही झाला होता.

आम्ही चुकीचे फटके मारले - धूल

पाक संघातून किती सीनियर खेळाडू खेळले याला भारतीय कर्णधार यश धुलने महत्त्व दिले नाही त्यांनी चांगली फलंदाजी केली मात्र आम्ही खराब फटके मारुन विकेच गमावल्या, साडे तीनशे धावांचा पाठलाग करताना अशी चुकीची फटकेबाजी मुळावर येते, असे सांगून यश धूल म्हणाला.

केवळ विजेतेपद हेच आमचे उद्दिष्ट नव्हते. समोर कोण खेळत आहे याचाही आम्ही विचार करत नव्हतो. अंतिम सामना गमावला असला तरी आम्हाला या स्पर्धेतून चांगला अनुभव मिळाला. स्पर्धेत ११ विकेट मिळवणाऱ्या निशांत सिंधूला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

या स्पर्धेतील अनुभवाचा फायदा आपल्या भविष्यात होणार असल्याचे त्याने सांगितले. अंतिम सामन्यात आव्हान मोठे असले तरी आम्ही त्याचा पाठलाग करण्याचे धैर्य दाखवले होते. परंतु यश हाती लागले नाही, असेही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT