Emerging Teams Asia Cup 2023  esakal
क्रीडा

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; यश धूलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ

अनिरुद्ध संकपाळ

Emerging Teams Asia Cup 2023 : ज्यूनियर क्रिकेट कमिटीने येत्या 13 जुलै ते 23 जुलै दरम्यान होणाऱ्या इमर्जिंग टीम्स आशिया कप 2023 साठीच्या भारतीय अ संघाची घोषणा केली. ही स्पर्धा आठ आशिया देशांमध्ये खेळली जाणार आहे. ही स्पर्धा 50 षटकांची होणार आहे. भारतीय अ संघ हा ग्रुप बी मध्ये आहेत. या ग्रुपमध्ये नेपाळ, युएई अ, आणि पाकिस्तान अ संघांचा समावेश आहे. तर ग्रुप ए मध्ये श्रीलंका अ, बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ आणि ओमान संघांचा समावेश आहे.

या दोन ग्रुपमधील पहिल्या दोन संघांमध्ये सेमी फायनल राऊंड खेळवला जाणार आहे. पहिला सेमी फायनल सामना हा ग्रुप ए मधील पहिल्या तर ग्रुप बी मधील दुसऱ्या क्रमांकावरील संघात खेळवला जाईल. तर दुसरा सामना हा ग्रुप बी च्या पहिल्या आणि ग्रुप ए मधील दुसऱ्या स्थानावरील संघात होणार आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय अ संघाची घोषणा झाली असून या संघचे नेतृत्व यश धूल करणार आहे. मात्र आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या नेहल वधेराला स्टँड बाय मध्ये ठेवण्यात आलेले आहे.

इमर्जिंग आशिया कप 2023 साठीचा भारतीय अ संघ :

यश धूल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंह, ध्रुव जुरेल, मानव सुथार, युवराज सिंह डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंह, नितीश कुमरा रेड्डी, राजवर्धन हंगरगेकर

स्टँडबाय खेळाडू :

हर्ष दुबे, नेहल वढेरा, स्नेह पटेल, मोहित रेडकर

प्रशिक्षक :

सितांशू कोटक (मुख्य प्रशिक्षक), साईराज बहुतुले (गोलंदाजी प्रशिक्षक), मुनीश बाली (फिल्डिंग कोच)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

Latest Marathi News Live Update : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

SCROLL FOR NEXT