eng vs aus 1st Test Day 2  
क्रीडा

ENG vs AUS : 'भाऊ हे काय...' स्टुअर्ट ब्रॉडच्या हॅटट्रिकसाठी बेन स्टोक्सने लावली विचित्र फिल्डिंग

Kiran Mahanavar

Ashes Eng vs Aus 1st Test Day 2 : अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंड ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या 393 धावांच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने लवकर 2 गडी गमावले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 9 धावा करून बाद झाला, तर मार्नस लबुशेनला खातेही उघडता आले नाही. यानंतर स्मिथ आणि ख्वाजा यांच्यात छोटीशी भागीदारी नक्कीच झाली, पण ही भागीदारीही स्मिथच्या विकेटसोबत तुटली. स्मिथने 59 चेंडूत 16 धावांची खेळी खेळली.

ऑस्ट्रेलियाच्या या अवस्थेत सोशल मीडियावर क्रिकेट चाहते बेन स्टोक्सच्या कर्णधारपदावर टीका करत आहेत. खरे तर शनिवारी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने डेव्हिड वॉर्नर आणि लॅबुशेनला सलग दोन चेंडूत बाद केले, तेव्हा बेन स्टोक्सने विचित्र फिल्डिंग लावली.

बेन स्टोक्सने सर्व खेळाडू स्टीव्ह स्मिथच्या अगदी जवळ सेट केले. यादरम्यान स्टोक्सने ऑफ साइड तसेच लेग साइड आणि शॉर्ट मिड ऑन अशा दोन स्लिप्स तैनात केल्या. स्मिथने हॅटट्रिक करणारा चेंडू कोणतीही अडचण न ठेवता सोडला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरच्या रूपाने संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर पुढच्याच चेंडूवर मार्नस लबुशेन गोल्डन डकचा बळी ठरला.

बेन स्टोक्सच्या मैदानी खेळावर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांना आश्चर्य वाटते की स्टोक्सने अशा फील्ड प्लेसमेंटचा विचार कसा केला? एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले आहे की, भाऊ तुम्ही काय करत आहात? आणखी एका युजरने लिहिले की, खेळपट्टीवर हे भरतनाट्यम चालले आहे काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Test Squad Announced: रिषभ पंतचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

Unseasonal Rains Cause: "पीक गेलं, आशा संपल्या… आणि आता जिओ टॅगिंगचा फोटोंचा त्रास शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाला कधी ऐकू येणार?"

Pune Viral Video: बिबट्याची थेट घरात एंट्री! मुलगा झोक्यावर… अन् पुढं काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ व्हायरल!

Women's World Cup : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन लेकींना प्रत्येकी २.२५ कोटी, अमोल मुझूमदार यांना...

Mumbai News: पुलाचे काम रखडले! घाटकोपरमध्ये पाच वर्षांपासून दुर्लक्ष; रहिवाशांची गैरसोय

SCROLL FOR NEXT