ENG Vs AUS Ashes 2023 Australia sensational win over England 
क्रीडा

ENG Vs AUS Ashes 2023: पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर सनसनाटी विजय! कर्णधार कमिन्सची कडक फलंदाजी

श्वास रोखून धरणाऱ्या कसोटीत इंग्लंडचा दोन गडी राखून पराभव

सकाळ वृत्तसेवा

ENG Vs AUS Ashes 2023 : पावसाचा व्यत्यय त्यात दोलायमान स्थिती अशा परिस्थितीत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या समन्यात ऑस्ट्रेलियाने सनसनाटी विजय मिळवला आणि पहिल्या अॅशेस कसोटीत इंग्लंडवर दोन विकेटने मात केली.

गोलंदाजीत चमक दाखवणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस फलंदाजीतही चमकला. संघ अडचणीत असताना त्याने नाबाद ४४ धावांची निर्णायक खेळी केली. निर्णायक क्षणी त्याला नॅथन लायनने मोलाची साथ दिली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी नाबाद ५५ धावांची भागीदारी केली.

ऑस्ट्रेलियाने आठवा फलंदाज गमावला आणि लायन मैदानात आला त्यावेळी त्यांना विजयासाठी ५४ धावांची गरज होती. पण लायन आणि कमिंस यांनी कमाल केली. कमिंसने रूटच्या एका षटकात मारलेले दोन षटकार त्याला आत्मविश्वास मिळवून देणारे ठरले.

पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रापर्यंत रंगलेल्या या समन्यात ऑस्ट्रेलियाला आज विजयासाठी १७४ धावांची गरज होती आणि सात फलंदाज शिल्लक होते, परंतु पावसामुळे जवळपास पहिले सत्र वाया गेले.

त्यानंतर खेळ सुरू झाल्यावर इंग्लिश गोलंदाजांनी टप्या टप्याने एकेक फलंदाज बाद केले. मात्र ख्वाजा एक बाजू लढवत होता. कॅमेरुन ग्रीन आणि अलेक्स केरी यांनी त्याला साथ दिली, परंतु स्टोक्सने ख्वाजाला बाद केल्यावर इंग्लंडचा मार्ग मोकळा झाला असे वाटत असताना कर्णधार कमिंसने बाजी पलटवणारी फलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड, पहिला डाव : ८ बाद ३९३ घोषित.

ऑस्ट्रेलिया, पहिला डाव : ३८६ इंग्लंड, दुसरा डाव : २७३

ऑस्ट्रेलिया, दुसरा डाव : ८ बाद २८२ (उस्मान ख्वाजा ६५, डेव्हिड वॉर्नर ३६, कॅमेरुन ग्रीन २८, अलेक्स केरी २०, पॅट कमिंस नाबाद ४४, नॅथन लायन नाबाद १६, स्टूअर्ट ब्रॉड ६४-३, रॉबिन्सन ४३-२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IT Sector: अमेरिका-इराण तणावाचा मुंबईच्या IT क्षेत्राला मोठा फायदा? Amazon-Microsoft घेऊ शकतात मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर छावणी परिसरात एका घराला अचानकपणे भीषण आग

'तुम्हाला ब्रा न घालण्याची मोकळीक का नाही?' अभिनेत्यानं व्यक्त केलं स्पष्ट मत, म्हणाला...'आम्हाला बनियान न घालण्याची...'

आता शाळांमध्ये लाठी-कराटेचे प्रशिक्षण मिळणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवी योजना कधीपासून सुरू होणार?

Rohit Sharma Wife Viral Video : रोहित शर्मावर भडकली पत्नी रितिका! T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर असं काय झालं, की कॅमेऱ्यासमोरच सुरू झाला वाद? पहा भांडणाचा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT