Pat Cummins Celebration 
क्रीडा

VIDEO: बॅट अन् हेल्मेट फेकलं अन्... कर्णधार पॅट कमिन्सनं थाटात साजरा केला कांगारूंचा विजय

या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सचे सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय आहे कारण...

Kiran Mahanavar

Eng vs Aus Test Pat Cummins Celebration : अॅशेस 2023 मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात इंग्लंडचा 2 गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकण्यासाठी कांगारू संघासमोर 281 धावांचे लक्ष्य होते, ते त्यांनी 8 गडी गमावून पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात कर्णधार पॅट कमिन्सने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 73 चेंडूत 44 धावांची खेळी खेळली, तो शेवटपर्यंत नाबाद राहिला.

कर्णधार पॅट कमिन्सच्या बॅटमधून विजयी धावा येताच त्याचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर कमिन्सने जल्लोषात मैदानावर पळत सुटला. यादरम्यान त्याने हेल्मेट आणि बॅटही फेकली. त्याने आपला सहकारी नॅथन लियॉनलाही आपल्या उचलून शानदार पद्धतीने विजय साजरा केला. त्यांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एजबॅस्टन येथे 281 धावांचा पाठलाग करून ऑस्ट्रेलियन संघाने इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले आहे. ऑस्ट्रेलियाचे 281 धावांचे आव्हान एजबॅस्टन येथे पाहुण्या संघाने दिलेले संयुक्त-सर्वोच्च पाठलाग आहे, याआधी दक्षिण आफ्रिकेने 2008 मध्ये 281 धावांचे आव्हान दिले होते.

त्याचबरोबर या कसोटीतील पराभवानंतर इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सलाही मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. इंग्लंडच्या या पराभवानंतर त्याच्या बेसबॉल पद्धतीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. इंग्लिश कर्णधाराने या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 393 धावांवर डाव घोषित केला होता.

जो रुट शतक झळकावून नाबाद खेळत असताना हा डाव घोषित करण्यात आला आणि त्यावेळी इंग्लंडच्या 2 विकेट्स शिल्लक होत्या पण बेन स्टोक्सने डाव घोषित करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता त्याचा हा निर्णय पराभवाचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे, मात्र स्टोक्सला या प्रकरणात काही फरक पडलेला दिसत नाही. अशा स्थितीत आगामी सामन्यांमध्ये इंग्लंड त्याच दृष्टिकोनाने खेळणार की त्यांच्या दृष्टिकोनात काही बदल होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT