eng vs ban 2nd t20i bangladesh-won-the-t20-series-against-world-champions-england  
क्रीडा

Eng vs Ban T20I : बांगलादेशने रचला इतिहास! विश्वविजेत्या इंग्लंडला प्रथमच चारली पराभवाची धूळ अन्...

Kiran Mahanavar

England vs Bangladesh T20I : मेहदी हसन मिराजची उत्कृष्ट गोलंदाजी आणि नजमुल हुसेन शांतोच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विश्वविजेत्या इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह बांगलादेशने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

बांगलादेशचा इंग्लंडविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिलाच द्विपक्षीय मालिका विजय आहे. इंग्लंडच्या 117 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने 18.5 षटकांत 6 गडी गमावून विजय मिळवला.

लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. 16 धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर वारंवार अंतराने विकेट पडत राहिल्या. पण शांतोने एक टोक धरले आणि 47 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 46 धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. याशिवाय सॅम कुरन, मोईन अली आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला 16 धावावर डेव्हिड मलानच्या रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर थोड्या अंतराने विकेट पडण्याची मालिका सुरू झाली. इंग्लंडकडून बन डकेटने सर्वाधिक 28 धावांची खेळी खेळली. याशिवाय सलामीवीर फिलिप सॉल्टने 25 धावा केल्या. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दहाचा आकडाही गाठता आला नाही.

बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 12 धावांत 4 तर तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, कर्णधार शकीब अल हसन आणि हसम महमूद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील पहिला टप्पा जून अखेरपर्यंत पूर्णत्वास

SCROLL FOR NEXT