Bangladesh beat England T-20 Series
Bangladesh beat England T-20 Series sakal
क्रीडा

Eng vs Ban T20I : बांगलादेशी वाघांकडून इंग्लंडची शिकार! साहेबांना 'व्हाईट वॉश' देत रचला इतिहास

Kiran Mahanavar

Bangladesh beat England T20 Series : विश्वविजेत्या इंग्लंडला बांगलादेशने मोठा धक्का दिला आहे. बांगलादेशने विश्वविजेत्या इंग्लंडला मायदेशात टी-20 मालिकेत पराभवाची धूळ चारली. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान बांगलादेशने 16 धावांनी विजय मिळवला. यासह बांगलादेशने मालिका 3-0 ने जिंकली.

मंगळवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशी संघाने 2 बाद 158 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात विश्वविजेता इंग्लंड संघ केवळ 142 धावाच करू शकला.

बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात प्रथमच द्विपक्षीय मालिका खेळल्या गेली. बांगलादेश संघाने प्रथमच आश्चर्यकारक कामगिरी केली. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडला तिसऱ्यांदा क्लीन स्वीप मिळाला आहे. यापूर्वी 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली होती.

बांगलादेशने चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 मध्ये 6 विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेशने ढाका येथे खेळवण्यात आलेला दुसरा टी-20 सामना 4 विकेटने जिंकला. मिरपूरमध्येही यजमानांचा विजयी प्रवास सुरूच होता. त्याने इंग्लंडला आपली इज्जत वाचवण्याची एकही संधी दिली नाही आणि तिसऱ्या टी-20मध्ये 16 धावांनी विजय मिळवून इतिहास रचला.

तिसऱ्या टी-20 सामन्याचा हिरो लिटन दास ठरला, ज्याने तुफानी फलंदाजी करत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 73 धावा ठोकल्या. त्याच्याशिवाय बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने नाबाद 47 धावा केल्या. आदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन या दोघांना 1-1 यश मिळाले.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघची सुरूवात खराब झाली. फिल सॉल्ट डावाच्या तिसऱ्या चेंडूवर गोल्डन डकवर बाद झाला. इंग्लंडकडून सलामीवीर डेव्हिड मलानने सर्वाधिक 53 धावा केल्या आणि जोस बटलरने 40 धावा केल्या. तस्किन अहमदने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT