Prithvi Shaw and Suryakumar Yadav  instagram
क्रीडा

ENG vs IND मुंबईकर इंग्लंडला पोहचले; आधी क्वारंटाइन मग...

सुरुवातीच्या कसोटी सामन्यांसाठी ही जोडी भारतीय संघासोबत नसेल

सुशांत जाधव

श्रीलंका दौरा आटोपल्यानंतर मुंबईकर पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार थेट इंग्लंडला पोहचले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या सुरुवातीलाच शुभमन गिल आणि वाशिंग्टन सुंदर यांना दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. या दोघांच्या जागी पृथ्वी आणि सूर्याची संघात वर्णी लागली आहे. ही जोडगोळी इंग्लंडमध्ये पोहचली देखील आहे.

श्रीलंकेतून इंग्लंड जाण्यासाठी निघाल्यानंतर सूर्यकुमार यादवने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली होती. आता थेट इंग्लंड अशा कॅप्शनसह त्याने फोटो शेअर केला होता. त्यानंतर इंग्लंडमध्ये पोहचल्याची पृथ्वी शॉने आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत दिलीये. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर या दोघांना क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. कोरोना प्रोटोकॉलची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतरच ते भारतीय ताफ्यात सामील होतील.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वनडे आणि टी-20 मालिकेसाठी श्रीलंका दौरा केला. पहिल्यांदा श्रीलंकेच्या ताफ्यात झालेला कोरोनाचा शिरकाव आणि त्यानंतर भारतीय संघातील काही खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली होती. मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. टी-20 मालिकेच्या दरम्यानत पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांची इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघात निवड करण्यात आली. पण भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव आणि इंग्लंड सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि श्रीलंकेतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातल्याने ही जोडी इंग्लंडला कशी जाणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. बीसीसीआयने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत यासंदर्भात विचारविनिमय केल्यानंतर अखेर दोघांना इंग्लंडमध्ये जाण्याची परवानी मिळाली. श्रीलंकेत या दोघांच्या तीन कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. आरटी-पीसीआर टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांचा इंग्लड दौऱ्यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइनची प्रक्रियेतून जाणे खेळाडूंसाठी सक्तीचे आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना संघापासून दूरच रहावे लागेल. नॉटिंघमच्या हॉटेलमध्ये ते क्वारंटाइन असणार असल्याचे समजते. त्यामुळे सुरुवातीच्या काही टेस्टसाठी ते उपलब्ध असणार नाहीत. सध्याच्या घडीला भारतीय संघातील मयांक अग्रवाल यानेही दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला नव्या ओपनरसह मैदानात उतरावे लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे! पावसाबाबत मोठी अपडेट समोर, हवामान विभागाकडून इशारा जारी

Lawrence Bishnoi: वेळीच स्वतःला सुधारा नाहीतर...; लॉरेन्स बिश्नोई टोळीला उघड इशारा, धमकी देणारा रोहित गोदरा नेमका कोण?

IND vs AUS: पहिला वनडे सामना हरूनही कर्णधार शुभमन गिल समाधानी; कारण सांगताना म्हणाला, 'या मॅचने आम्हाला...'

Pune Cyber Fraud : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक

Diwali Get-Together Recipes: दिवाळी गेट-टुगेदरची मजा आणि शान वाढवा खास दुधी-अलमंड-हनी हलवा आणि कुरकुरीत छोले-कबाबसह!

SCROLL FOR NEXT