Rohit Sharma Six Girl Injured ेोकोत
क्रीडा

Video : रोहितचा षटकार थेट लहान मुलीला लागला अन् इंग्लंडचे फिजिओ...

इंग्लंडचे फिजिओ तातडीने मुलीला पाहण्यासाठी धावले

Kiran Mahanavar

England Vs India 1st ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने भादक मारा करत इंग्लंडला 110 धावात गुंडाळले. बुमराहने 6 तर शमीने 3 विकेट घेतल्या. इंग्लंडने दिलेल्या 110 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अशी घटना घडली, जी पाहिल्यानंतर चाहत्यांचे मन भरून आले. (rohit sharma six little girl injured england physio helped)

पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने पुल शॉट मारताना सिक्सर मारला. रोहितने षटकार मारला आणि धवनच्या दिशेने गेला. मात्र कॅमेरामनने चेंडूला फॉलो केलं. चेंडू थेट सीमापार स्टेडियम मध्ये बसलेल्या एका लहान मुलीला लागला. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला लगेच उचलले आणि शांत करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर काही काळ सामना थांबवण्यात आला, त्यानंतर इंग्लंडचे फिजिओ तातडीने मुलीला पाहण्यासाठी धावले.

पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडला केवळ 110 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने हा सामना 10 गडी राखून जिंकला.रोहित शर्माने नाबाद 76 तर शिखर धवनने नाबाद 31 धावा केल्या. या जोडीला बाद करताना इंग्लंडला घाम फुटला, दोघांनीही हे लक्ष्य केवळ 19 व्या षटकातच गाठले. यासह टीम इंडिया आता तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT