क्रीडा

सामन्याआधीच साहेबांना दोन मोठे धक्के, महत्वाच्या खेळाडूंना दुखापत

नामदेव कुंभार

IND vs ENG : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर आज भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. गुरुवारपासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. मात्र, त्याआधीच इंग्लंड संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. महत्वाचे आणि आघाडीचे वेगवान गोलदाज दुखापतग्रस्त झाले आहेत. जेम्स अँडरसन आणि स्टअर्ट ब्रॉड या आघाडीच्या दोन्ही खेळाडूला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

एकीकडे इंग्लंडचा संघ ग्रीन टॉपच्या खेळपट्टीचा विचार करत असला तरी त्यांना प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे प्लॅन फसू शकतो. प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना दुखपत झाली आहे. यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळेच इंग्लंड संघाने तातडीने मार्क वूड आणि सादिक महम्मद यांचा संघात समावेश केला आहे. मोईन अली यालाही पाचारण केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान आपल्या संघांत मोठे बदल करु शकतो.

इंग्लंडप्रमाणे पाहुण्या भारतीय संघालाही दुखापतीचा सामना करावा लागत आहे. शार्दुल ठाकूर याने दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. त्यामुले शार्दुलच्या जागी नेमकी कुणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शार्दुलच्या जागी इंशांत शर्मा आणि आर. अश्विन यापैकी नेमकी कुणाला संधी मिळणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. खेळपट्टी पाहाता भारतीय संघ फलंदाजी आधिक मजबूत करणार की? गोलंदाजीला बळकटी देणार? हे सामन्याआधीच समजेल.

अखेरच्या दिवशी पावसामुळे पहिल्या कसोटीचा अंतिम दिवसाचा खेळ वाया गेला. भारताला १५७ धावांची गरज होती; तर इंग्लंडला नऊ विकेटची. विजयाची अधिक संधी भारताला होती, परंतु फलंदाजीबाबत झाकली मूठ सव्वा लाखाचीच राहिली होती. हा बोध घेत संघातील मधल्या फळीच्या फलंदाजांना जबाबदारी पार पाडावीच लागणार आहे. त्यासाठी चेतेश्वर पुजारा, स्वतः विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना धावा कराव्याच लागणार आहेत. लॉर्डसच्या खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच निर्णय घेतला जाईल. विराटने जर चार वेगवान गोलंदाजांच्या रचनेला प्राधान्य दिले, तर ईशांत शर्मा किंवा उमेश यादव संघात येतील. ४+१ या रचनेने आम्ही दुसऱ्या कसोटीत खेळू, असे सूचक विधान कोहलीने पहिल्या कसोटीनंतर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT