eng vs nz 3rd test england win new zealand by 7 wickets सकाळ
क्रीडा

ENG vs NZ: तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडने वर्चस्व राखले, बेन स्टोक्स बदलले नशीब

इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला आणि न्यूझीलंड 3-0 ने केले क्लीन स्वीप

Kiran Mahanavar

ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात यजमानांनी शानदार विजय नोंदवत पाहुण्या संघाचा 3-0 असा धुव्वा उडवला. ही कसोटी मालिका ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2021-23 अंतर्गत खेळली गेली, ज्यामध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व बेन स्टोक्सने केले.(eng vs nz 3rd test england win new zealand by 7 wickets)

कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी संघाचे नशीब बदलण्याचे काम केले आहे. यापूर्वी इंग्लंडच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागत होता, पण आता इंग्लंडच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव करून चमत्कार केला आहे. चौथ्या डावात जवळपास 300 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे कधीही सोपे नसते. पण इंग्लंड संघाने गेल्या दोन सामन्यांमधील तुफानी कामगिरी पुन्हा एकदा केली ज्यामुळे विजय मिळवला.

बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, आणि संघाने प्रथम फलंदाजी करताना 329 धावा केल्या, ज्यामध्ये डॅरिल मिशेलच्या शतकाचा समावेश होता. त्याचवेळी इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 360 धावा केल्या आणि 31 धावांची किरकोळ आघाडी घेतली. यात जॉनी बेअरस्टोच्या 162 आणि जेमी ओव्हरटनच्या 97 धावांचा समावेश होता. न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या डावात एकूण 326 धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी 296 धावांचे लक्ष्य मिळाले, जे इंग्लंड संघाने 54.2 षटकात 3 गडी गमावून पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT