Eng vs Afg sakal
क्रीडा

Eng vs Afg icc t20 world cup : इंग्लंडचा सलामीला निसटता विजय

सॅम करनच्या पाच विकेट; अफगाणच्या गोलंदाजांनी झुंजवले

सकाळ वृत्तसेवा

पर्थ : ताकदवान इंग्लंडने अफगाणिस्तानचा पाच विकेटने पराभव करून ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत विजयी सलामी दिली; परंतु ११३ धावांच्या आव्हानासमोर पाच विकेट गमावताना ११ चेंडू शिल्लक ठेऊनच त्यांच्या नावावर विजय झळकला.

सॅम करनने पाच विकेट मिळवून इंग्लंडच्या विजयाचा मार्ग उघडला; परंतु विजयाचे लक्ष्य गाठेपर्यंत इंग्लंडची दमछाक झाली. अफगाणच्या गोलंदाजांनी आपल्या हाताशी तुटपुंज्या धावा असल्या, तरी लढण्याचे धैर्य दाखवले.

अफगाणच्या या पराभवास त्यांची फलंदाजी कारणीभूत ठरली. झद्रान आणि गनी यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज हजेरी लावण्यापुरते मैदानात येत होते. यास इंग्लंडची अनुभवी गोलंदाजी कारणीभूत होती.

सॅम करन इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. हॅटट्रिकची संधी हुकली असली, तरी त्याने पाच विकेट मिळवण्याचा पराक्रम केला.

इंग्लंडसाठी ११३ धावांचे लक्ष्य सोपे होते. त्यातील ३५ धावा कर्णधार बटलर आणि अलेक्स हेल्स या सलामीवीरांनी करून दिल्या होत्या; परंतु अफगाणिस्तानचा फिरकी मारा सुरू झाला, तसे इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले. नाबाद राहिलेल्या लिव्हिंगस्टोनच्या २९ धावा या इंग्लंडकडून सर्वाधिक धावा झाल्या. अफगाणची गोलंदाजी प्रभाव पाडणारी असली, तरी त्यांनी १२ अवांतर धावा दिल्या. त्याही त्यांच्या मुळावर आल्या.

संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान : १९.४ षटकांत सर्वबाद ११२ (इब्राहिम झद्रान ३२ -३२ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, उस्मान घनी ३० -३० चेंडू, ३ चौकार, बेन स्टोक्स ४-०-१९-२, मार्क वूड ४-०-२३-२, सॅम करन ३.४-०-१०-५) पराभूत वि. इंग्लंड ः १८.१ षटकांत ५ बाद ११३ (जॉस बटलर १८, अलेक्स हेल्स १९, डेव्हिड मलान १८, लियम लिव्हिंगस्टोन नाबाद २९, फझहक फारूकी ४-०-२४-१, रशीद खान ४-०-१७-१, महम्मद नबी ३-०-१६-१)

इंग्लंडकडून सर्वोत्तम गोलंदाजी

५/१० सॅम करन वि. अफगाणिस्तान (पर्थ २०२२)

४/२ आदिल रशीद वि. विंडीज (दुबई २०२१)

४/६ ख्रिस जॉर्डन वि. विंडीज (बासेतेरे २०१९)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, गैर काय? उपमहापौरांनी स्पष्ट केली भूमिका

लाइफ बना दूँगा! रिलस्टार बनवण्याचं आमिष, १५ वर्षीय मुलीवर युट्यूबरचा लेकासह अत्याचार; दोघांना अटक

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

"आता मी सिंगल पण आधी.." ब्रेकअपबद्दल रिंकूचा पहिल्यांदाच खुलासा ; "रिलेशनशिपची मला भीती वाटते.."

Surya Grahan 2026: फाल्गुन अमावस्या खास ठरणार! भारतात सूतक नसल्याने ‘या’ शुभ गोष्टी नक्की करा

SCROLL FOR NEXT