Euro Cup 2024 semis England vs Netherlands sakal
क्रीडा

Euro Cup 2024 : भगव्या वादळाला हरवून इंग्लंडने Euro Cupच्या फायनलमध्ये, ट्रॉफीसाठी 'या' दिवशी स्पेनशी भिडणार

Euro Cup 2024 Semis : ओली वॅटकिन्सने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलमुळे इंग्लंडने युरो 2024 च्या उपांत्य फेरीत नेदरलँड्सविरुद्ध 2-1 असा विजय मिळवून युरो 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली.

Kiran Mahanavar

Euro Cup 2024 semis England vs Netherlands : ओली वॅटकिन्सने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलमुळे इंग्लंडने युरो 2024 च्या उपांत्य फेरीत नेदरलँड्सविरुद्ध 2-1 असा विजय मिळवून युरो 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली. आता विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा सामना तीनवेळचा चॅम्पियन स्पेनशी होणार आहे. फ्रान्सचा पराभव करून स्पेनने अंतिम फेरी गाठली होती.

या मॅचमध्ये इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नव्हती, कारण झेवी सिमन्सने नेदरलँडसाठी पहिला गोल केला. मात्र, इंग्लंडनी सामना 2-1 असा जिंकून शेवट चांगलाच केला. इंग्लंडने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. शेवटच्या वेळी 2021 मध्ये इटलीविरुद्ध विजेतेपदाच्या लढतीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

नेदरलँडविरुद्ध खराब सुरुवातीनंतर हॅरी केनने पुनरागमनाचा पाया रचला. जर्मन रेफ्री फेलिक्स झ्वेअरने व्हीएआर कॉल केल्यानंतर हॅरी केनच्या पेनल्टीमुळे इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी साधली आणि अतिरिक्त वेळेत वॉटकिन्सने केलेल्या शानदार गोलने त्यांना विजय मिळवून दिला.

गॅरेथ साउथगेटच्या इंग्लंड संघाने सलग दुसऱ्यांदा युरोपियन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत आणि ते 1966 नंतर पहिली मोठी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहत आहेत. युरो 2024 चा विजेतेपदाचा सामना रविवारी 14 जुलै रोजी इंग्लंड आणि स्पेन यांच्यात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT