ICC Womens World Cup 2022 NZ vs ENG Sakal
क्रीडा

VIDEO : वर्ल्ड कपमधील 'सुपर वुमन'; हवेत उडी मारुन एकहाती कॅच

सकाळ डिजिटल टीम

ICC Womens World Cup 2022 , ऑकलंड : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंड आणि इंग्लंड (NZ vs ENG) यांच्यातील सामन्यात क्षेत्ररक्षणाचा जबरद्सत नजराणा पाहायला मिळाला. इंग्लंडची कर्णधार हेदर नाइट (Heather Knight) हिने एका हातात घेतलेला कॅच स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वोत्तम झेलपैकी एक असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ऑकलंडच्या मैदानात इंग्लंड संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

न्यूझीलंडच्या डावातील 39 व्या षटकात इंग्लंड संघाची कर्णधार हेदर नाइट (Heather Knight) हिने संघाला विकेट मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तिने सुपर डाइव मारत एका हातामध्ये सुंदर झेल टिपला. तिने दाखवून दिलेला क्षेत्ररक्षणाचा उच्च दर्जा बघण्याजोगा होता. आयसीसीने इंस्टाग्राम अकाउंटवरुन या कॅचचा व्हिडिओ शेअर केला आहे.

न्यूजीलंडची बॅटर ली ताहू (Lea Tahuhu) हिने 39 व्या षटकातील फुल लेंथ चेंडूवर हवेत चेंडू फटकावला. हा चेंडू झेलमध्ये रुपांतरित होईल आणि तिला विकेट गमवावी लागेल, असे वाटत नव्हते. पण हेदर हिने हवेत उडी मारत सुपर वुमनच्या तोऱ्यात अशक्यप्राय वाटणारा झेल टिपून दाखवला.

यजमान न्यूझीलंड संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 48.5 षटकात 203 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून मेडी ग्रीन हिने 52 धावांची सर्वोच्च खेळी साकारली. ती शेवटपर्यंत नाबाद राहिली. दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात इंग्लंड महिलांनी बाजी मारली. नॅटली स्किव्हरचे अर्धशतक आणि हेदर नाइटच्या उपयुक्त 42 धावांच्या जोरावर इंग्लंडने स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. या सामन्यातील पराभवामुळे न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडी

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT