Virat-Kohli-Joe-Root
Virat-Kohli-Joe-Root 
क्रीडा

कोहलीबद्दल कसोटी मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बोलला रूट

विराज भागवत

विराटला त्याचं हे बोलणं कितपत रूचेल हा प्रश्नच आहे... वाचा सविस्तर

Ind vs Eng 4th Test: टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला रनमशिन (Run Machine) असं म्हटलं जातं. पण गेल्या काही दिवसांपासून विराटला धावा करण्यासाठी फारच अडचण (Out of Form) येत असल्याचं दिसतंय. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत (Ind vs Eng Test Series) विराटने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. एका सामन्यात ४२ तर एका सामन्यात ५५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. विराट लय मिळवण्यासाठी झगडत असतानाच इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने विराटबद्दल मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. (Cricket News)

"विराटला कसोटी मालिकेत अद्याप मोठा खेळी करता आलेली नाही याचे श्रेय इंग्लंडच्या गोलंदाजांना जाते. कारण विराटमध्ये प्रचंड प्रतिभा आहे. तो हव्या तशा आणि हव्या तेवढ्या धावा काढण्यास सक्षम आहे. अशा खेळाडूला धावा काढू न देणं ही गोलंदाजांच्या कौतुकाची गोष्ट आहे. विराटची बॅट शांत ठेवण्यात आम्हाला यश आलंय ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला जर ही कसोटी मालिका जिंकायची असेल तर त्यासाठी आम्हाला विराटला शांत ठेवावं लागेल. त्याला धावा करण्यापासून रोखलं तर आम्ही नक्कीच मालिका जिंकू. महान फलंदाजांना बाद करण्याचे मार्ग प्रतिस्पर्धी संघाला शोधावे लागतात. विराटला कसं बाद करायचं त्याचा पर्याय आमच्या गोलंदाजांना सापडला आहे. आता त्यानुसार खेळ सुरू ठेवणं आवश्यक आहे", असे स्पष्ट मत जो रूटने व्यक्त केले.

"विराटची सत्ता गाजवण्याची सवय त्याचा घात करतेय"

"विराट उत्तम फलंदाज आहे. त्याच्या तयारीत काहीच उणीव राहत नसणार याची मला खात्री आहे. पण मला वाटतंय की विराट प्रत्येक गोलंदाजावर सत्ता गाजवायला जातो. त्यामुळे तो ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडूदेखील खेळतो. ही एक छोटी गोष्ट आहे. पण अतिआक्रमकपणा विराटला सध्या भोवतोय. विराटच्या फलंदाजीच्या तंत्रात काहीच अडचण नाहीये. खरी समस्या त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. विराट कोहलीचा अतिआक्रमकपणा त्याला धावा करण्यापासून नकळतपणे रोखतोय", अशा शब्दात भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने विराटची कानउघाडणी केली आणि त्याच्या खराब फॉर्मचे विश्लेषण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT