क्रीडा

लंकेच्या विजयानंतर Points Table मध्ये राडा, तर इंग्लंडच्या पराभवाने बाबरच्या पाकिस्तानला मोठा धक्का

Kiran Mahanavar

World Cup 2023 Points Table : आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेता इंग्लंड संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या त्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला इंग्लिश संघ अवघ्या 156 धावांवर गडगडला. श्रीलंकेने विजयाचे लक्ष्य 25.4 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले.

आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने विद्यमान विश्वविजेत्या इंग्लंडला मोठा धक्का दिला. आता चॅम्पियन इंग्लंड आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप मधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

श्रीलंका संघाविरुद्ध 8 गडी राखून झालेल्या दारूण पराभवानंतर संघ गुणतालिकेत बांगलादेशच्या खाली 9व्या स्थानावर पोहोचला आहे. पण इंग्लंडच्या पराभवाने बाबरच्या पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघ पाचव्या वरून आता सहाव्या स्थानावर घसरला आहे. तर श्रीलंकेला या विजयाचा फायदा झाला आणि तो थेट सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आले. अफगाणिस्तान सातव्या स्थानावर आहे. हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने इंग्लंड आणि पाकिस्तानचा पराभव केला आहे.

इंग्लंडशिवाय अन्य दोन संघही वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. यामध्ये बांगलादेश आणि नेदरलँडचा समावेश आहे. बांगलादेश आणि नेदरलँड या दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 सामने खेळले असून चार सामने गमावले आहेत. बांगलादेश, इंग्लंड आणि नेदरलँड्सचे प्रत्येकी 2 गुण आहेत. पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर नेदरलँड्स शेवटच्या 10व्या स्थानावर आहे. इंग्लंड 9व्या तर बांगलादेश 8व्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आतापर्यंतचे पाचही सामने जिंकून अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने 5 पैकी 4-4 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट +2 आहे, ज्यामुळे तो क्रमांक-2 वर आहे आणि न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT