England Reece Topley World Cup 2023 
क्रीडा

World Cup 2023 : इंग्लंडसाठी दुष्काळात तेरावा! दिग्गज वेगवान गोलंदाज वर्ल्ड कपमधून होणार बाहेर?

Kiran Mahanavar

England Reece Topley World Cup 2023 : या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड क्रिकेट संघाची अवस्था अत्यंत वाईट आहे. संघाने आतापर्यंत 4 पैकी फक्त 1 सामना जिंकता आला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याचा वाईट पराभव झाला.

दुष्काळात तेरावा म्हणजे, आता वेगवान गोलंदाज रीस टोपली वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. ज्याच्या बोटाला दुखापत झाली आहे.

स्काय स्पोर्ट्सशी बोलताना इंग्लंड संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट म्हणाले की, आम्ही रीस टोपलीच्या बोटाच्या दुखापतीवर अपडेट्स घेत आहोत. तेथे थोडा क्रॅक असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याला खेळणे थोडे कठीण वाटते. जर टोपली वर्ल्ड कपमधून बाहेर पडला तर त्याची जागा कोणता खेळाडू घेईल हे निश्चित नाही. जोफ्रा आर्चरबद्दल चर्चा सुरू आहे. पण मॅथ्यू मॉटने स्पष्ट केले आहे की, जोफ्रा रीस टोपलीची जागा घेणार नाही.

रीस टोपलीचा आतापर्यंत वर्ल्ड कप चांगला गेला आहे. तो आतापर्यंत इंग्लंडकडून 3 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 8 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याने 3 विकेट घेतल्या आहे. असे असतानाही इंग्लंडचा संघ हा सामना हरला.

सध्याचा इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस व्हॉक्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Live Updates Marathi : 'पॅलेट गन चालवण्याचा आदेश कुणी दिला? गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं'; प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

MPSC Exam: 'एमपीएससी'चं चाललंय काय? अपात्र उमेदवारांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय; माहिती व जनसंपर्क विभागाची भरती प्रक्रिया कासवगतीने

SCROLL FOR NEXT