Kevin Pietersen esakal
क्रीडा

भारताच्या 'या' निर्णयाचं इंग्लंडच्या स्टार क्रिकेटरनं केलं तोंडभरुन कौतुक

सकाळ डिजिटल टीम

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ वेरिएंटनं जगासाठी चिंता निर्माण केलीय.

या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ Omicron (B.1.1.529) वेरिएंटनं जगासाठी चिंता निर्माण केलीय. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी स्टार क्रिकेटर केविन पीटरसनं (Kevin Pietersen) ओमिक्रॉननं प्रभावित देशांना मदत दिल्याबद्दल भारताचं कौतुक केलंय. त्यानं ट्विटरमध्ये लिहिलंय, भारतानं पुन्हा एकदा सेवा करण्याचं धाडस दाखवलंय. सोमवारी परराष्ट्र मंत्रालयानं एक निवेदन प्रसिध्द करत भारत (India) ओमिक्रॉन प्रकारांमुळं प्रभावित आफ्रिकन (Africa) देशांसोबत उभा असून मेड इन इंडिया लस आणि औषधे पुरवण्यासाठी तयार आहे, असं सांगितलं.

माजी क्रिकेटपटू पीटरसननं भारताच्या याच निर्णयाचं कौतुक केलंय. त्यानं ट्विटमध्ये म्हटलंय, की भारतानं पुन्हा एकदा सेवा करण्याचं धैर्य दाखवलंय! हा देश खूपच विलक्षण देश आहे, असं सांगत पीटरसननं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही टॅग केलंय. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, भारत सरकार आफ्रिकन देशांना मेड इन इंडिया लस, आवश्यक औषधे, चाचणी किट, पीपीई किट आणि व्हेंटिलेटरसह इतर वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा करण्यास तयार आहे. हा पुरवठा COVAX द्वारे किंवा द्विपक्षीयरित्या केला जाईल. मालावी, इथोपिया, झांबिया, मोझांबिक, गिनीया आणि लेसोथो या आफ्रिकन देशांमध्ये कोविशील्ड लस वितरीत करण्यासाठी कोवॅक्सनं दिलेल्या सर्व आदेशांना सरकारनं मान्यता दिलीय.

निवेदनात म्हटलंय, की आम्ही बोत्सवानाला कोवॅक्सीनचा पुरवठा करण्यास मान्यता दिलीय. भारतीय संस्था जीनोम संबंधित संशोधनासाठी आफ्रिकन देशांना मदत करण्याचा विचार करत आहे. मंत्रालयानं सांगितलं की, भारतानं आफ्रिकेतील 41 देशांना आतापर्यंत 25 दशलक्षाहून अधिक मेड इन इंडिया लसींचा पुरवठा केला आहे. यामध्ये सुमारे 16 देशांमध्ये 10 दशलक्ष डोस आणि Covax द्वारे 33 देशांमध्ये 16 दशलक्ष डोस दिले गेले आहेत.

पीटरसनचा भारतीय संघाला असाही पाठिंबा

या महिन्यात टी-20 विश्वचषकातील पराभवानंतर टीकेचा सामना करणाऱ्या भारतीय संघाला (Indian Cricket Team) पीटरसननं पाठिंबा दिला होता. त्यानं हिंदीत ट्विट करत म्हटलं होतं, की खेळात एक विजेता आणि हरणाराही असतो. कोणताच खेळाडू हरण्यासाठी खेळत नाही. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं हा सर्वात मोठा सन्मान आहे. त्यामुळं खेळातील लोक रोबोट नसतात, त्यांना नेहमीच समर्थनाची आवश्यकता असते, असं तो म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT