Ben Stokes  esakal
क्रीडा

Ben Stokes : स्टोक्स तुला हात जोडून विनंती करतो... इंग्लंडच्या माजी कर्णधाराला कोण अन् कशासाठी एवढ्या विनवण्या करतंय?

अनिरुद्ध संकपाळ

Ben Stokes ODI World Cup 2023 : इंग्लंडने 2019 चा वनडे वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला होता. त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्डकपवर नाव कोरले. यंदा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये विश्वविजेता इंग्लंड आपले टायटल वाचवण्यासाठी जोर लावणार आहे. यासाठी ते आपल्या दोन दर्जेदार खेळाडूंचा वापर करण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. (ICC ODI World Cup 2023)

यातील एक आहे इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि दुसरा आहे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर! इंग्लंडची निवडसमिती मंगळवारी आपला वर्ल्डकपसाठीचा 18 जणांचा प्राथमिक संघ निवडणार आहे. दरम्यान मर्यादित षटकांच्या इंग्लंड संघाचं प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी डेली मेल स्पोर्ट्सला या बैठकीपूर्वी दोन गोष्टी महत्वाच्या असल्याचे सांगितले. (England ODI World Cup 2023 Squad)

जॉस बटलरने बेन स्टोक्सला फोन करणं आणि जोफ्रा आर्चरच्या फिटनेसबाबतची अपडेट या त्या दोन गोष्टी आहेत ज्यावर इंग्लंडचा भारतात येणारा वर्ल्डकप संघ कसा असेल हे ठरवतील.

बेन स्टोक्सने नुकत्याच झालेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध लॉर्ड्स कसोटीत 155 धावांची आणि लीड्स कसोटीत 80 धावांची दमदार खेळी केली होती. यावरून स्टोक्स हा अजूनही एकहाती सामना फिरवू शकतो हे सिद्ध होते. ऑस्ट्रेलियाविरूद्धची ही कसोटी मालिका इंग्लंडने पिछाडी भरून काढत ड्रॉ केली.

बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्याने खेळू शकला नाही. त्याची कामगिरीही म्हणावी तशी चांगली झाली नाही. जोफ्रा आर्चर देखील इंग्लिश समरला मुकला मात्र त्याने या आठवड्यात ससेक्सच्या नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे.

मॉट स्टोक्सबद्दल म्हणाले की, 'जॉस बटलर हा बेन स्टोक्स सोबत संपर्क करणार आहे. बेन स्टोक्स हा तसाही स्पष्टवक्ता आहे. आम्ही तो वर्ल्डकप खेळण्यासाठी उत्सुक आहे की नाही हे पाहणार आहोत. तो काय करणार हे अजून स्पष्ट नाही. मात्र आम्ही अजूनही आशावादी आहोत.'

'मी कायम म्हणतो की त्याची गोलंदाजी ही एक जमेची बाजू आहेच मात्र तो फलंदाजीत देखील मोठे योगदान देऊ शकतो. त्याची फिल्डिंग देखील कमाल आहे. अॅशेस मालिकेत त्याला पाहिले आणि त्याचा संघातील वावर हा खूप छान होता. तो हे अनेक काळापासून करतो आहे. वनडे क्रिकेटमध्ये तो एक अमुल्य संपत्ती आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT