IND vs ENG 
क्रीडा

IND vs ENG : यजमान इंग्लंड 70 धावांनी पिछाडीवर

सुशांत जाधव

सलामीवीर लोकेश राहुलच्या 84 धावांच्या खेळीनंतर रविंद्र जडेजानं केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर 56(86) भारतीय संघाने पहिल्या डावात 278 धावा केल्या आहेत. 95 धावांच्या अल्प आघाडीसह भारतीय संघाचा डाव संपुष्टात आला. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सन (5) आणि अँडरसन (4) विकेट घेतल्या. तर अजिंक्य रहाणेच्या रुपात भारतीय संघाने रन आउटच्या रुपात एक विकेट फेकल्याचे पाहायला मिळाले.

तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळात व्यत्यही आणला. त्यामुळे निर्धारित षटकांचा खेळ होऊ शकला नाही. भारतीय संघाचा डाव आटोपल्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात देखील झाली. तिसऱ्या दिवसाअखेर रॉरी बर्न्स 11(38) आणि डॉमिनिक सिब्ले 9(33) धावांवर खेळत होते. या दोघांनी इंग्लंडच्या धावफलकावर बिन बाद 25 धावा लावल्या होत्या. इंग्लंडचा संघ अजूनही 70 धावांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 183 धावांत आटोपल्यानंतर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या जोडीने भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात केली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. रॉबिन्सन याने रोहित शर्माला 36 धावांत माघारी धाडत भारतीय संघाला पहिला धक्का दिला. अँडरसन याने पुजाराला अवघ्या 4 धावांवर माघारी धाडले. भारतीय संघाचा कर्णधार कोहलीला खातेही उघडता आले नाही. अँडरसननेच त्याची विकेट घेतली. रहाणे 5 धावांची भर घालून धावबाद झाला. पंतने 20 चेंडूत 25 धावांची खेळी केली. तो माघारी फिरल्यानंतर शतकाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या लोकेश राहुलने 84 (214) धावांवर मैदान सोडले. अँडरसनने त्याला जोस बटलरकरवी झेलबाद केले. शार्दुल ठाकूरला खातेही उघडता आले नाही. त्याची विकेटही अँडरसननेच घेतली. रविंद्र जडेजापाठोपाठ मोहम्मद शमी 13 (20) आणि जसप्रीत बुमराह 28(34) यांना बाद करत रॉबिन्सनने भारतीय डाव संपुष्टात आणला. भारतीय संघाने पहिल्या डावात 84.5 षटकांत 278 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT