IND vs ENG Twitter
क्रीडा

IND vs ENG: सेहवागला शमी-बुमराहमध्ये दिसली द्रविड-लक्ष्मणची झलक

तळातील फंलदाजांच्या जिगरबाज खेळीनं भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागही फिदा झालाय.

सुशांत जाधव

England vs India, 2nd Test At Lord's, London : लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय. पहिल्या डावात 364 धावा करणाऱ्या भारतीय संघाने दुसरा डाव 8 बाद 298 धावांवर घोषित केला. बुमराह आणि शमीनं केलेल्या 89 धावांच्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर 272 धावांचे आव्हान ठेवले. नवव्या विकेटसाठी भारताकडून झालेली ही विक्रमी भागीदारी ठरली.

तळातील फंलदाजांच्या जिगरबाज खेळीनं भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागही फिदा झालाय. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आणि भारत-इंग्लंड यांच्यातील काँमेंट्री पॅनलमध्ये असलेल्या सेहवागने सोशल मीडियाच्या माध्यमातून शमी-बुमराहच्या फलंदाजीचं कौतुक केले आहे.

सेहवागने या जोडगोळीची तुलना थेट द्रविड-लक्ष्मणशी केलीये. सेहवागने या दोघांच्या फलंदाजीचे कौतुक करण्यासाठी खास कॅप्शनसह एक फोटो शेअर केलाय. "मौज कर दी...शमी, बुमराह तालिया बजती रहनी चाहिए" असे ट्विट सेहवागने केले आहे. बुमराह आणि शमीच्या धमाकेदार फलंदाजीनंतर सोशल मीडियावर बुमराह-शमीत द्रविड-लक्ष्मणची झलक दाखवणारी मीम्स व्हायरल होताना दिसते. याचाच आधार घेत सेहवागने या जोडीची दिग्गजांशी तुलना केल्याचे पाहायला मिळाले.

तत्पूर्वी भारतीय संघाने पहिल्या डावात 394 धावा केल्यानंतर इंग्लंडने कर्णधार ज्यो रुटच्या नाबाद 180 धावांच्या खेळीच्या जोकावर 391 धावा करत या सामन्यात 27 धावांची आघाडी घेतली होती. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने 6 बाद 181 धावा केल्या होत्या. यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी भागीदारीचा समावेश होता. पाचव्या दिवशीच्या खेळात पंत आणि ईशांत शर्माच्या रुपात भारतीय संघाने दोन विकेट गमावल्या. बुमराह आणि शमीच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 298 धावांपर्यंत मजल मारली. 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. शून्यावर त्यांनी दोन विकेट गमावल्या. त्याच्यापाठोपाठ आणखी एक विकेट पडल्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या असून पुन्हा त्यांची मदार कर्णधारावर अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT