Joe Root Twitter
क्रीडा

IND vs ENG Test Day 2 : अखेरचं सत्र भारताचं, पण रुट खेळतोय मस्त

पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ज्यो रुटने पुन्हा एकदा कर्णधाराला साजेसा खेळ करताना दिसला.

सुशांत जाधव

England vs India, 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसातील तिसरे सत्र भारतीय संघाच्या गोलंदाजांनी गाजवले. 31 षटकात 96 धावा खर्च करत भारताने तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाचा डाव 364 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावाला सुरुवात केली. रॉरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ले या जोडीने इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. इंग्लंडच्या धावफलकावर अवघ्या 23 धावा असताना सिराजने सिब्लेच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.

त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या हसीब हमीदला सिराजने आल्या पावली चालते करत यजमानांना अडचणीत आणले. पण त्यानंतर कर्णधार ज्यो रुटने रॉरी बर्न्सच्या साथीनं संघाचा डाव सावरला. ही जोडी सेट झाल्यानंतर दुसरा दिवस इंग्लंडच्या नावे होणार असे वाटत होते. मात्र धावफलकावर 108 धावा असताना शमीने इनस्विंगवर रॉरी बर्न्सला पायचित करत भारताला तिसरे यश मिळवून देत तिसरे सेशन भारताच्या बाजूनं वळवले.

रॉरी बर्न्स 136 चेंडूत 49 धावा करुन बाद झाला. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ज्यो रुटने पुन्हा एकदा कर्णधाराला साजेसा खेळ करताना दिसला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रुट 75 चेंडूचा सामना करुन 48 धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला जॉनी बेयरस्ट्रो 17 चेंडूत 6 धावांवर नाबाद होता. इंग्लंडने 45 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 119 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ अजूनही 245 धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशी ज्यो रुटला लवकरात लवकर बाद करुन सामन्यावर मजबूत पकड मिळवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

10th Pass Govt Jobs: दहावी पास असाल? मग ही दिल्लीतील सरकारी नोकरी चुकवू नका, लगेच करा येथे अर्ज

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT