IND vs ENG Twitter
क्रीडा

IND vs ENG 'विराट' मासा लागला सॅमच्या गळाला; टीम इंडिया संकटात

भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिले सत्र इंग्लंडच्या नावे

सुशांत जाधव

England vs India, 2nd Test : लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडलाय. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलसह कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतला आहे. इंग्लंडच्या संघाने 27 धावांची अल्प आघाडी घेतली होती. ही आघाडी भेदून इंग्लंडसमोर टार्गेट ठेवण्यासाठी रोहित आणि लोकेश राहुल यांनी भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पहिल्याच सत्रातील 10 व्या षटकात मार्क वूडने पहिल्या डावातील शतकवीर लोकेश राहुलला अवघ्या 5 धावांवर माघारी धाडले. त्याच्यापाठोपाठ मार्क वूडने रोहित शर्मालाही 21 धावांवर बाद केले. डाव सावरण्याची जबाबदारी पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर येऊन पडली.

सॅम कुरेननं विराट कोहलीच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. 20 धावांवर खेळत असताना सॅम कुरेनचा चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन यष्टीमागे असलेल्या जोस बटलरच्या हातात विसावला. विराटची विकेट मिळाल्यानंतर सॅम कुरेननं जोरदार सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सेशनमध्ये भारतीय संघाने 25 षटकांच्या खेळात तीन विकेटच्या मोबदल्यात 56 धावा केल्या आहेत. भारतीय संघाने 29 धावांची आघाडी घेतली असून उपकर्णधार अजिंक्य रहाणे 1 (8) आणि पुजारा 3 (48) धावांवर खेळत होते.

पहिल्या डावात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी केली होती. या जोडीकडून पुन्हा एकदा त्याच धमाकेदार खेळीची अपेक्षा होती. मार्क वूडने सलामीवीर लोकेश राहुलला गतीने चकवा दिला. तो यष्टीरक्षक बटलरकडे झेल देऊन परतला. मार्क वू़डच्या चेंड़ूवरच रोहित शर्मानेही मोईन अलीकडे झेल दिला. या दोघांसह कर्णधार विराट कोहलीच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 364 धावा केल्या होत्या. तिघेही तंबूत परतल्यामुळे सामना वाचवण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. पुजारा आणि अजिंक्य रहाणे पहिल्या कसोटी सामन्यासह पहिल्या डावात नावाला साजेसा खेळ करु शकलेले नाहीत. या दोघांवरही टीका होत असताना ते आता आपल्यातील क्षमता सिद्ध करुन ही जोडी टीकाकारांना बॅटने उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'कॅप्टन' खरातचे सिन्नरमध्ये मालमत्तांचे जाळे; पत्नीच्या नावावर कोट्यवधींचे भूखंड, तपासात नवी माहिती समोर

"दागिन्यांच्या जाहिरातीत माझ्यासारख्या मुलीला.." प्रियदर्शिनीच्या बहिणीची रवी जाधव यांच्यासाठी भावूक पोस्ट

Raj Thackeray: संतांची भूमी आणि भोंदूंचा उच्छाद; अशोक खरातसारख्या नीचला राजकीय आश्रय? पोस्टमधून राज ठाकरेंचा संताप, काय म्हणाले?

अल्पवयीन मुलींना गर्भपातास परवानगी, पण बाळाला जन्म दिल्यास काय होणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Why Acidity Suddenly Increases : उन्हाने पोट दुखतं, पित्ताशयात खडे तर नाहीत ना? ॲसिडिटीचाही होतोय त्रास? कडक उन्हाळ्यात अनेकांना आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT