IND vs ENG Twitter
क्रीडा

ENG vs IND Day 1 Stumps : शतकी सलामीसह इंग्लंडनं घेतली आघाडी

इंग्लंडने 42 धावांची आघाडी घेतली असून पहिला दिवस आज इंग्लंडच्या संघाने गाजवला.

सुशांत जाधव

England vs India, 3rd Test Day 1 Stumps: लीड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मजबूत पकड मिळवली आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाचा पहिला डाव 78 धावांत आटोपून इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. रॉरी बर्न्स आणि हसीब हमीत या सलामी जोडीच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने दिवसाअखेर बिनबाद 120 धावा केल्या आहेत. इंग्लंडने 42 धावांची आघाडी घेतली असून पहिला दिवस आज इंग्लंडच्या संघाने गाजवला.

टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या भारतीय संघाला जेम्स अँडरसनने सुरुवातील धक्क्यावर धक्के दिले. दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा लोकेश राहुलला खातेही उघडता आले नाही. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला पुजारा अवघी एक धाव काढून माघारी फिरला. कर्णधार विराट कोहलीलाही अँडरसनने अवघ्या 7 धावांवर माघारी धाडले. रोहित शर्माच्या 19 (105) धावा आणि अजिंक्य रहाणेच्या 18 (54) धावा वगळता अन्य कोणालाही दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. 40.4 षटकात भारतीय संघाचा पहिला डाव 78 धावांत आटोपला.

रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद या जोडीने इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी संयमी खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला त्यावेळी बर्न्स 125 चेंडूत 52 धावांवर खेळत होता. तर दुसऱ्या बाजूला 130 चेंडूंचा सामना करणाऱ्या हसीब हमीदने 60 धावा केल्या होत्या. दोघांच्या शतकी भागीदारीमुळे फलंदाजीतही इंग्लंडच्या संघाचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT