ENG VS IND Twitter
क्रीडा

इंग्लंडकडून व्याजासह पराभवाची परतफेड; मालिका बरोबरीत

या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीये.

सुशांत जाधव

England vs India 3rd Test : लीड्सच्या मैदानातील कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाने केलेल्या पराभनाची व्याजासह परतफेड केलीये. लॉर्ड्सच्या मैदानातील151 धावांनी विजय नोंदवणाऱ्या टीम इंडियाला इंग्लंडने एक डाव 76 धावा आणि एक दिवस राखून पराभूत केले. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीये.

हेडिंग्लेच्या लीड्सच्या मैदानात नाणेफेक जिंकून विराट कोहलीने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय फलंदाजांनी व्यर्थ ठरवला. पहिल्या दिवशीच्या खेळात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना अक्षरश: गुडघे टेकायला लावले. भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून कर्णधार ज्यो रुटने 121 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय बर्न्स (61), हसीब हमीद (68) आणि डेविड मलान यांने 70 धावांचे योगदान दिले. पहिल्या डावातील खेळानंतर इंग्लंडने 354 धावांची मजबूत आघाडी घेतली होती.

या भक्कम आघाडीला भेदून काढण्याच्या इरद्याने मैदानात उतलेल्या टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. लोकेश राहुल अवघ्या 8 धावा करुन परतला. त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि पुजाराच्या अर्धशतकासह कर्णधार कोहलीच्या आश्वासक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दमदार खेळ दाखवला. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने 2 बाद 215 धावा केल्या होत्या. पुजारा (91) आणि कोहली 45 नाबाद राहिले होते.

टीम इंडियाला पुजाराच्या रुपात तिसरा धक्का बसला. चौथ्या दिवशी एकही धाव न करता त्याला माघारी परतावे लागले. कोहली अर्धशतकी खेळी करुन बाद झाला. त्याच्यापाठोपाठ अजिंक्य रहाणे आणि पंतनेही तंबूचा रस्ता धरला. मोहम्मद शमी आणि ईशांत शर्माही थोडा वेळ थांबून माघारी फिरले. रविंद्र जडेजाने 30 धावांची खेळी केली. क्रेग ओव्हरटनने सिराजला बाद करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या दुसऱ्या डावात ओली रॉबिन्सनने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. ओव्हरटन 3 तर मोईन अली आणि अँडरसनला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT