Cheteshwar Pujara  Twitter
क्रीडा

पुजारानं खाते उघडण्यासाठी घेतले इतके चेंडू; भन्नाट मीम्स व्हायरल

या परिस्थितीत भारताची भिंत बनून मैदानात तग धरुन उभे राहण्याची क्षमता असलेला पुजारा डाव सावरण्याच्या इराद्याने खेळताना दिसला.

सुशांत जाधव

England vs India, 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पहिल्या डावात 129 धावांची खेळी करणाऱ्या लोकेश राहुलने अवघ्या 5 धावांवर मैदान सोडले. दुसरीकडे पहिल्या डावातील अर्धशतकवीर रोहित शर्माने नको त्या वेळी नको तो फटका खेळून नाहक विकेट फेकली. किंग कोहलीही सॅमला फसला आणि त्यानेही 20 धावा करुन मैदान सोडले. एका बाजूला भारतीय संघाची बिकट अवस्था झाली आहे. या परिस्थितीत भारताची भिंत बनून मैदानात तग धरुन उभे राहण्याची क्षमता असलेला पुजारा डाव सावरण्याच्या इराद्याने खेळताना दिसला. एकदा मैदानात नांगर टाकला की तो सहजा सहजी विकेट फेकत नाही. सध्याच्या घडीला त्याच्याकडून संयमी खेळीचीच अपेक्षा आहे.

पुजाराने 35 चेंडू खेळल्यावर काढली पहिली धाव

चौथ्या दिवसाच्या खेळात सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यानंतर कोहली आणि चेतेश्वर पुजाराकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. एका बाजूला विराट त्याच्या ढंगात खेळत होता दुसरीकडे संयमी पुजारा आपल्या तोऱ्यात संयमी खेळी करत होता. सॅम कुरेननं 20 धावांवर कोहलीला बाद केले. कोहली मैदानात असतानाच पुजाराने खाते उघडले. पण यासाठी त्याने 35 चेंडूंचा सामना केला. एखाद्या खेळाडूने शतकी खेळी केल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजरात त्या खेळाडूचे स्वागत करावे असाच काहीसा प्रकार लॉर्ड्सच्या मैदानात पुजारासोबत खाते घडल्यानंतर घडल्याचे पाहायला मिळाले. पुजाराच्या संयमी खेळीनंतर सोशल मीडियावरही गंमतीशीर मीम्स व्हायरल होताना दिसते.

द्रविडनं 40 चेंडूनंतर उघडले होते खाते

2008 मध्ये राहुल द्रविडने सीडनीच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशीच संयमी खेळी केली होती. त्याने एक धाव घेण्यासाठी 40 चेंडू खेळून काढले होते. द्रविडपेक्षा पाच चेंडू कमी खेळत पुजाराने खाते उघडले. त्याने धाव घेतल्यानंतर लॉर्ड्सच्या प्रेक्षक गॅलरीतून टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT