England vs Sri Lanka on stake is place in SEMIFINAL  sakal
क्रीडा

ENG vs SL : इंग्लंडच्या मार्गात श्रीलंकेचा अडथळा! उपांत्य फेरीत कोण जाणार?

श्रीलंकेने इंग्लंडला पराभूत केले तरच ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीची आशा

सकाळ ऑनलाईन टीम

England vs Sri Lanka T20 World Cup : २०१० मध्ये विश्वविजेता ठरलेल्या इंग्लंडकडे यंदाच्या टी-२० विश्वकरंडकात उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी असणार आहे. जॉस बटलरच्या इंग्लंड संघाला गट एकमधील आजच्या लढतीत श्रीलंकेला हरवण्याची गरज आहे. यासाठी त्यांना सरासरी वाढवण्याचीही गरज नाही. कारण त्यांना ज्या संघाला मागे टाकायचे आहे, त्या ऑस्ट्रेलियन संघाची सरासरी ही इंग्लंडपेक्षा कमी आहे. फक्त कांगारूंकडे ७ गुण आहेत. इंग्लंडने श्रीलंकेला पराभूत केल्यास त्यांचेही ७ गुण होतील व त्यांचा संघ चांगल्या सरासरीने अंतिम चारमध्ये पोहोचेल. पण याप्रसंगी त्यांच्या मार्गात आशियाई विजेत्या श्रीलंकेचा अडथळा असणार आहे.

आयर्लंडकडून पराभवाचा धक्का मिळालेल्या इंग्लंडने अफगाणिस्तान व न्यूझीलंडवर विजय मिळवत या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले, पण आता ५ गुणांवर असलेल्या इंग्लंडला अखेरच्या लढतीत कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. श्रीलंकेने त्यांना पराभूत केल्यास गट एकमधून न्यूझीलंडसह ऑस्ट्रेलिया आगेकूच करील. जॉस बटलर, अॅलेक्स हेल्स यांनी आतापर्यंत समाधानकारक फलंदाजी केली असली तरी डेव्हीड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, हॅरी ब्रुक यांच्याकडून फलंदाजीत मोठी अपेक्षा आहे. सॅम करण याने १ फलंदाज बाद केले आहेत.

ख्रिस वोक्स व मार्क वूड हेदेखील छान कामगिरी करीत आहेत. मात्र फिरकी गोलंदाज अदिल रशीद याच्याकडून विकेट घेण्याची अपेक्षा बाळगण्यात येत आहे.

दृष्टिक्षेपात

• श्रीलंकेने २०१४ नंतर टी-२० सामन्यात इंग्लंडला पराभूत केलेले नाही. गेल्या आठ वर्षांमध्ये इंग्लंडने टी-२० सामन्यात श्रीलंकेला सात वेळा पराभूत केले आहे.

• इंग्लंडच्या सॅम करण याने तीन सामन्यांमधून ९ फलंदाज बाद केले आहेत. पहिल्या फेरीत न खेळलेल्या गोलंदाजांपैकी फक्त ॲनरीक नॉर्किया याने करणपेक्षा जास्त (१० बळी) बळी टिपले आहेत. पहिल्या फेरीपासूनच विचार केल्यास वनिंदू हसरंगा याने आतापर्यंत सर्वाधिक १३ फलंदाज बाद केले आहेत.

हसरंगा, तीक्षाणावर मदार

श्रीलंकन संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र या स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी त्यांचा संघ मैदानात उतरणार आहे. वनिंदू हसरंगा व माहीश तीक्षाणा या फिरकी गोलंदाजांवर लंकेची मदार असणार आहे. इंग्लंडच्या फलंदाजांना या दोन गोलंदाजांसमोर निष्काळजी खेळ करून चालणार नाही.

खेळपट्टी व हवामान कसे असेल

इंग्लंड-श्रीलंका यांच्यामधील लढत सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. येथे आतापर्यंत पाच लढती खेळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. याचा फायदा श्रीलंकन फिरकी गोलंदाजांना होऊ शकतो. अर्थात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांकडे अशाप्रकारच्या खेळपट्ट्यांवर कशाप्रकारे गोलंदाजी करावयाची हे चांगलेच माहीत आहे. संथगतीने चेंडू टाकण्याचे कसबही त्यांना माहीत आहे. पावसाची शक्यता नसल्याचे | यावेळी हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT