Mithali Raj AND Jhulan Goswami
Mithali Raj AND Jhulan Goswami Twitter
क्रीडा

मिताली-झुलनचा खास विक्रम, द्रविड-गांगुलीला टाकले मागे

सुशांत जाधव

England Women vs India Women Test Record : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत उतरताच भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि जलदगती गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांच्या नावे खास विक्रमाची नोंद झालीय. दोघींनी 2002 मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले होते. या दोघी आता भारतीय संघाकडून सर्वाधिक काळ कसोटी खेळणाऱ्या खेळाडू बनल्या आहेत. मिताली राज आणि झुलन गोस्वामी 14 जानेवारी 2002 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरताच त्यांचे कसोटी कारकिर्द ही 19 वर्ष आणि 154 दिवसांची झालीये. इंग्लंडच्या मैदानात भारतीय महिला संघ हा अपराजित राहिला आहे. ही कामगिरी कायम राखून नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मिताली ब्रिगेड मैदानात उतरली आहे.

महिला क्रिकेटमध्ये वेरा बर्ट (Vera Burt) आणि मॅरी हाइड (Mary Hide) यांच्या नावे सर्वाधिक काळ कसोटी खेळण्याचा विक्रम आहे. न्यूझीलंडच्या वेरा बर्ट यांनी 20 वर्षे 335 दिवस कसोटीत संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. इंग्लंडच्या मॅरी हाइड यांच्या नावे 19 वर्षे 211 दिवस कसोटी करियरचा विक्रम आहे.

भारतीय क्रिकेटसंदर्भात विचार करायचा झाल्यास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे ज्याची कसोटी कारकिर्द ही या दोन महिला खेळाडूंपेक्षा अधिक आहे. भारतीय संघाची भिंत अशी ओळख असलेल्या राहुल द्रविड यांची कसोटी कारकिर्द 15 वर्ष 222 दिवस तर सौरव गांगुलींचे करियर 12 वर्ष 143 दिवस इतके आहे. मिताली राज हिने वनडे पदार्पण हे 1999 मध्ये केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT