ENG vs NZ Ben Stokes 
क्रीडा

ENG vs NZ Ben Stokes : इंग्लंडच्या संघाची घोषणा! वर्ल्डकप जिंकून देणारा खेळाडू 13 महिन्यानंतर परतला

Kiran Mahanavar

Ben Stokes Reverses ODI Retirement ENG vs NZ : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 पूर्वी इंग्लंडचा स्टार बेन स्टोक्सने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. 18 जुलै 2022 रोजी स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेट सोडण्याची घोषणा केली होती. पण तब्बल 13 महिन्यांनंतर तो पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये परतला आहे.

2019 मध्ये इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात बेन स्टोक्सचे मोठे योगदान होते. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये त्याने मॅचविनिंग 84 धावांची मोठी खेळी खेळली होती.

इंग्लंड क्रिकेटने आज दुपारी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली. एकदिवसीय संघातील मोठे नाव म्हणजे बेन स्टोक्स. निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणार आहे.

अलीकडेच, अ‍ॅशेसपूर्वी मोईन अलीने कसोटीतून निवृत्ती घेतली होती, परंतु अ‍ॅशेसनंतर त्याने पुन्हा कसोटीतून निवृत्ती घेतली. बेन स्टोक्सने यापूर्वी इंग्लंडकडून 105 वनडे सामन्यात 2924 धावा केल्या होत्या, यासोबत 74 विकेटही घेतल्या आहेत. आता पुन्हा एकदा स्टोक्स आगामी विश्वचषकात करू शकतो. अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसू शकतो.

इंग्लंड क्रिकेटने प्रत्येकी 15-15 सदस्यांचे दोन संघ जाहीर केले आहेत. त्यात अनेक अनकॅप्ड खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडचा संघ 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध चार टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर चार एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळवली जाईल.

बेन स्टोक्सशिवाय वेगवान गोलंदाज आणि अनकॅप्ड खेळाडू गस ऍटकिन्सनचाही इंग्लंडच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. तर अ‍ॅटकिन्सन, जोश टंग आणि जॉन टर्नर यांना टी-20 मालिकेत संधी देण्यात आली आहे.

स्टोक्सच्या निवडीबद्दल राष्ट्रीय मुख्य निवडकर्ता ल्यूक राइट म्हणाले की, मला खात्री आहे की स्टोक्सच्या पुनरागमनाने सर्व क्रिकेट चाहते खूश होतील.

संपूर्ण इंग्लंड संघ -

एकदिवसीय : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

T20: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, डेविड मलान, आदिल रशीद, जोश टोंग, जॉन टर्नर, हॅरी ब्रूक, बेन डकेट, ल्यूक वुड, विल जॅक्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway : कोकणवासीयांची चिंता वाढली! मे महिना उजाडला तरी परशुराम घाटातील काम अपूर्णच; यंदाही एकेरी वाहतुकीचा जाच?

बंगालमध्ये २० जागांवरून सुरू झालेला वाद निकालात कोणाच्या पथ्यावर? पाहा TMC आणि भाजपची स्थिती

Tamil Nadu Assembly Election: चेन्नईत मोठी राजकीय उलथापालथ, विजय यांच्या चालकाच्या मुलाचा राजकीय विजय; भावूक झाल्याचा व्हिडिओ ‘व्हायरल'..

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

Pune Crime : नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा! तोंडात पायमोजा कोंबून अत्याचार, चिमुकलीच्या छातीवर जखमांच्या खुणा; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT