Erloda Boxing Cup  sakal
क्रीडा

Erloda Boxing Cup : गौरव, मोनिका, मनीषाचे पदक पक्के

भारताच्या तीन खेळाडूंनी एर्लोडा बॉक्सिंग करंडकात दमदार कामगिरी करीत तीन पदके पक्की केली.

सकाळ वृत्तसेवा

अस्ताना (कझाकस्तान) : भारताच्या तीन खेळाडूंनी एर्लोडा बॉक्सिंग करंडकात दमदार कामगिरी करीत तीन पदके पक्की केली. कझाकस्तान येथील अस्ताना येथे ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू आहे. गौरव चौहान, मनीषा व मोनिका यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली.

गौरव चौहान याने ९२पेक्षा जास्त किलो वजनी गटात कझाकस्तानच्या डॅनियल सपारबाय याच्यावर ३-२ असा संघर्षमय विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मनीषा हिने ६० किलो वजनी गटात कझाकस्तानच्याच झेड. एडाना हिच्यावर ५-० असा सहज विजय नोंदवला व आगेकूच केली.

मोनिका हिने ८१ पेक्षा जास्त किलो वजनी गटात कझाकस्तानच्या डीना इस्लामबेकोवा हिला ४-१ असे पराभूत केले व पुढे पाऊल टाकले. पुरुष विभागात शिव थापा याला ६३.५ किलो वजनी गटात; तर संजय याला ८० किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला. लालफाकमावी राल्टे हिचाही पराभव झाला. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

Marathi News Live Updates : आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण डूल्ला निलंबित; विद्यार्थ्यांच्या तीन दिवसांच्या आंदोलनानंतर कारवाई

Daily Horoscope: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२६

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

SCROLL FOR NEXT