Belgium vs Italy Twitter
क्रीडा

Euro 2020 : इटली सेमी फायनलसाठी नटली! वर्ल्ड नंबर वन बेल्जियम आउट

2016 मध्ये इटली आणि बेल्जियम दोन्ही संघांचा प्रवास हा क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात आला होता. यावेळी बेल्जियम आउट झाली असून इटलीने युरो कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

सुशांत जाधव

Euro 2020 Belgium vs Italy : क्वार्टर फायनलमधील दुसऱ्या सामन्यात इटलीने लुकाकुच्या वर्ल्ड नंबर वन बेल्जियमला 2-1 असे पराभूत करत सेमी फायनल गाठली. पहिल्या हाफमधील 31 व्या मिनिटाला निकोलो बरेला (Nicolò Barella) याने गोल डागत इटलीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. लोरेंझो इनसिनिया (Lorenzo Insigne) याने 44 व्या मिनिटाला आघाडी आणखी मजबूत केली. बॅकफूटवर असलेल्या बेल्जियमला रोमेलू लुकाकूने दिलासा दिला. त्याने हाफ टाईमपूर्वी मिळालेल्या पेनल्टीची संधी गोलमध्ये रुपांतरित केली. इंज्युरी टाईममध्ये लुकाकूने बेल्जियमसाठी पहिला गोल डागला. त्यामुळे 45+2 मिनिटांच्या खेळानंतर बेल्जियमने स्कोअर बोर्ड 1-2 असा बदल केल्याचे पाहायला मिळाले. हाफ टाईमचा खेळ थांबला तो याच स्कोअरवर. इटलीने पहिल्या हाफमध्ये मिळालेली आघाडी कायम राखत बेल्जियमला स्पर्धेतून आउट केले. इटलीने सामन्यात 2-1 असा विजय नोंदवत सेमी फायनलचे तिकीट मिळवले. आता सेमी फायनलमध्ये इटली आणि स्पेन यांच्यात सामना रंगणार आहे. (Euro 2020 Belgium 1-2 Italy Barella Insigne and Lukaku goals Italy Met Spain In Semi Final)

2016 मध्ये इटली आणि बेल्जियम दोन्ही संघांचा प्रवास हा क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात आला होता. यावेळी बेल्जियम आउट झाली असून इटलीने युरो कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये आगेकूच केलीये. क्वार्टर फायनलमधी सर्वात तगडा सामना म्हणून इटली आणि बेल्जियम यांच्यातील सामन्याकडे सर्व फुटबॉल प्रेमींच्या नजरा लागून होत्या. दोन्ही संघ यंदाच्या युरो कप स्पर्धेतील प्रबळ दावेदारांच्या यादीतील होते. फुटबॉल जागतिक क्रमवारीत बेल्जियमचा संघ अव्वलस्थानी होता. दुसरीकडे इटलीने सलग 31 सामन्यात पराभव स्विकारला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघातील लढतही कांटे की होणार हे निश्चित होते. बेल्जियमचा संघ तगडा आहे. मोठी स्पर्धा जिंकून फुटबॉल जगतात नवा इतिहास रचण्यासाठी संघ प्रयत्नशील होता. पण इटलीने त्यांच्या इराद्यावर पाणी फेरले. बेल्जियमच्या ताफ्यातील स्टार खेळाडू रोमेलु लुकाकूने गोल डागला पण त्याच्या संघाच्या विजयासाठी तो एक गोल पुरेसा ठरला नाही. इटली विरुद्धच्या सामन्यात बेल्जियमच्या ताफ्यातील मिडफिल्डर कुठे तरी कमी पडले आणि त्याचा इटलीला फायदा झाला.

रॉबर्टो मॅनचिनीच्या मार्गदर्शनाखालील इटली संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासून धमाकेदार खेळ करुन यंदाच्या स्पर्धेत धमाका करण्याचे संकेत दिले आहेत. मागील युरो स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये प्रवास संपुष्टात आलेल्या इटलीने यंदा आगेकूच केलीय. इटलीचा संघ मागील 31 सामन्यात अपराजित राहिला होता. यात आता आणखी एका विजयाने त्यांचे रेकॉर्ड आणखी मजबूत केले आहे. 82 वर्षांचा रेकॉर्ड मोडित काढत इटलीने नाव विक्रम प्रस्थापित केलाय. बेल्जियम विरुद्ध इटलीने 13 वा सामना जिंकलाय. मागील 11 सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्ध्याला एकही गोल करु दिला नव्हता. बेल्जियमने एक गोल करुन त्यांच्या या विक्रमाला पूर्ण विराम लावला असला तरी त्यांची स्पर्धेतील आगेकूच रोखण्यात बेल्जियम अपयशी ठरलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT