Czech Republic vs Denmark  Twitter
क्रीडा

EURO 2020 : जिगरबाज डेन्मार्कची सेमीफायनलमध्ये धडक

सलामीच्या सामन्यात क्रिस्टियन एरिक्सनच्या अपघाती घटनेनंतर कमालीची कामगिरी दाखवत यंदाच्या युरो कप स्पर्धेत त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे.

सुशांत जाधव

CZE vs DEN Euro 2020 Quarterfinals : डेन्मार्कने तुल्यबळ असलेल्या चेक प्रजासत्ताक विरुद्धच्या क्वार्टरफायनलमध्ये 2-1 असा विजय नोंदवत सेमीफायनलचे तिकीट पक्के केले. सलामीच्या सामन्यात क्रिस्टियन एरिक्सनच्या अपघाती घटनेनंतर कमालीची कामगिरी दाखवत यंदाच्या युरो कप स्पर्धेत त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. सामन्याच्या सुरुवातीच्या पाचव्या मिनिटाला थॉमस डेन्लीने पहिला गोल डागत डेन्मार्कला 1-0 आघाडी मिळवून दिली. कॅसपर डॉलबर्गनं 42 व्या मिनिटाला आघाडी आणखी भक्कम केली. (EURO 2020 Denmark Win 2-0 Against Czech Republic And Enter Semi)

चेक प्रजासत्ताकचा स्टार खेळाडू पॅट्रिक शीकने दुसऱ्या हाफमधील 49 व्या मिनिटाला गोल डागत संघाचे खाते उघडले. या गोलसह त्याने पोर्तुगालचा स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोची बरोबरीही केली. रोनाल्डोसह तो सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळांडूमध्ये आघाडीवर पोहचला. दोघांच्या नावे प्रत्येकी 5-5 गोलची नोंद आहे.

दोन्ही संघ यापूर्वी 2004 मध्ये क्वार्टरफायनलमध्ये एकमेकांविरुद्ध भिडले होते. यावेळी चेक प्रजासत्ताकने 3-0 अशी बाजी मारली होती. या पराभवाची परतफेड करत जिगरबाज डेन्मार्कने सेमीफायनलचे तिकीट मिळवले. मॅचचे विशेष म्हणजे चेक प्रजासत्ताकने 56 टक्के बॉलवर नियंत्रण ठेवले. पण 44 टक्के बॉलवर नियंत्रण ठेवूनही डेन्मार्कच भारी ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT