Denmark vs Wales
Denmark vs Wales  Twitter
क्रीडा

Euro: वेल्सचा 4-0 ने धुव्वा; डेन्मार्क क्वार्टर फायनलमध्ये

सुशांत जाधव

EURO 2020 : क्रिस्टियन एरिक्सनच्या संघाने स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवलीये. सलामीच्या सामन्यात एरिक्सन मैदानात कोसळल्याने बसलेला मोठा धक्का आणि त्यानंतर साखळी सामन्यातील दोन पराभवानंतर खचून न जाता आपल्यातील क्षमता सिद्ध करत संघाने बाद फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व सामन्यात वेल्सला 4-0 अशा फरकाने पराभूत करत संघाने स्पर्धेतील आपली घोडदौड कायम ठेवली आहे. 17 वर्षानंतर बाद फेरीत पोहचलेल्या डेन्मार्कने वेल्सचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आणला. (EURO 2020 Dolberg Goals Denmark Win 4-0 against Wales and enter quarters)

बाद फेरीतील पहिल्या सामन्यात वेल्स विरुद्ध कॅसपर डॉलबर्गने 27 व्या मिनिटाला संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफपर्यंत डेन्मार्कने ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या हाफमधील 47 व्या मिनिटाला कॅसपर डॉलबर्गने आणखी एक गोल डागून आघाडी भक्कम केली. 88 व्या मिनिटाला जोकिम आणि एक्स्ट्रा टाईमध्ये मार्टिन ब्रेथवेटने केलेल्या गोलच्या जोरावर त्यांनी 4 गोल डागत स्पर्धेत उलथापालथ करण्याची क्षमता असल्याचा इशाराच दिलाय.

इतर संघाच्या तुलनेत कमकुवत असणाऱ्या दोन संघामध्ये रंगतदार सामना पाहायला मिळेल असे वाटले होते. पण डेन्मार्कने एकतर्फी वर्चस्व राखले. साखळी सामन्यात वेल्सने 3 पैकी एका सामन्यात विजय आणि 1 सामना अनिर्णित राखत 4 गुणांसह अंतिम 16 मध्ये प्रवेश केला होता. क्लब फुटबॉलमध्ये रियाल माद्रिदकडून खेळणाऱा स्टार फॉरवर्ड क्वार्टर फायनलच्या सामन्यातही अपयशी ठरला. त्याला स्पर्धेत एकही गोल करता आला नाही. त्याचा वेल्सला फटका बसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT