Euro 2020 Point Table  
क्रीडा

Euro 2020 Point Table : 'हार कर जितने वाला बाजीगर' आणि...

सुशांत जाधव

UEFA Euro 2020 Group A Point Table : युरो कप स्पर्धेत इटलीपाठोपाठ वेल्सने पहिल्या 16 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या ग्रुपमध्ये स्वित्झर्लंड जर-तरच्या समीकरणात टिकून असून तुर्कीचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आलाय. इटलीने साखळी सामन्यातील अखेरच्या लढतीत वेल्सला 1-0 असे पराभूत करत विजयाची हॅटट्रिक नोंदवली. दुसरीकडे पराभवानंतरही वेल्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला आणि त्यांनी देखील नॉक आउट राउंडमध्ये प्रवेश केलाय. 'हार कर जितनेवाला बाजीगर' असंच काहीस चित्र वेल्सबाबत घडल्याचे पाहायला मिळाले.

इटलीने साखळी सामन्यातील 3 विजयासह 9 गुण मिळवले आहेत. त्यांच्या खालोखाल वेल्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. वेल्सने तुर्की संघाविरुद्ध 2-0 असा विजय नोंदवला होता. तर स्वित्झर्लंड विरुद्धचा सामना 1-1 बरोबरीत राखला होता. इटली विरुद्धच्या पराभवानंतर त्यांच्या खात्यात 4 गुण जमा झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्वित्झर्लंडने तुर्की विरुद्ध 3-1 असा विजय मिळवला होता. इटलीकडून त्यांना 3-0 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला तर वेल्स विरुद्धचा सामना 1-1 असा अनिर्णित राहिला.

ग्रप बीमध्ये फिफा वर्ल्ड रँकिंगमधील अव्वल असलेला बेल्जियम संघ अव्लस्थानी आहे. दोन सामन्यातील दोन विजयासह त्यांनी 6 गुण मिळवले आहेत. त्यांचा प्ले ऑफचा मार्ग सहज आणि सुलभ दिसतोय. रशियाचा 3-0 असा धुव्वा उडवल्यानंतर बेल्जियमने पिछाडीवरुन डेन्मारकला 2-1 असा पराभवाचा दणका दिला होता. त्यांचा पुढील सामना हा फिनलंड विरुद्ध होणार आहे. दुसरीकडे याच ग्रुपमधील रशियाचा संघ डेन्मार्कशी भिडणार आहे.

जर बेल्जियमच्या संघाला फिनलंडने चमत्कारिक रित्या पराभवाचा दणका दिला आणि रशियाला डेन्माकरने नमवले तर या ग्रुपमधील समीकरण बदलू शकते. या परिस्थितीत फिनलंड दुसऱ्या स्थानावर येईल. पण बेल्जियमने सलग तिसरा विजय नोंदवला तर रशियाचा आणि डेन्मार्क यांच्यातील रिझल्ड काही लागला तरी रशिया नॉक राउंडसाठी पात्र ठरेल.

ग्रप सी मध्ये नँदरलंड दोन सामन्यातील दोन विजयासह अव्वलस्थानावर आहे. युक्रेनने दोन पैकी एका सामन्यातील विजय आणि एका पराभवासह 3 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे.

ग्रुप डी मध्ये चेक प्रजासत्ताक आणि इंग्लंड या दोन्ही संघानी दोन सामन्यात एक विजय आणि एक मॅच ड्रा खेळत प्रत्येकी 4-4 गुण मिळवले आहेत. क्रोएशिया आणि स्कॉटलंडने यांनी एक ड्रॉ आणि एक पराभवासह प्रत्येकी 1-1 गुण मिळवलाय. या ग्रपमध्ये जर-तरचे समिकरण दिसण्याची शक्यता आहे.

ग्रुप ई मध्ये स्वीडन सेफमध्ये आहे. त्यांनी दोन सामन्यात एक सामना जिंकला असून एक सामना बरोबरीत राखत 4 गुण मिळवले आहेत. स्लोवाकियाने दोन सामन्यातील एक विजय आणि एक पराभव स्विकारत 3 गुण मिळवले आहेत. दोन्ही सामने ड्रॉ ठेवत स्पेन 2 गुणासह तिसऱ्या तर पोलंड दोन पैकी एक पराभव आणि एक ड्रॉसह चौथ्या स्थानावर आहे.

ग्रुप एफ हा डेथ ग्रुप म्हणून ओळखला जातो. यात दोन सामन्यातील एक विजय आणि एक ड्रॉसह फ्रान्सने अव्वलस्थान राखले आहे. जर्मनीला दोन पैकी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असून एका विजयासह त्यांनी 3 गुण मिळवले आहेत. गत विजेता पोर्तुगाल दोन पैकी एक विजय आणि पराभव स्विकारुन 3 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. दोन सामन्यानंतर हंगेरीच्या खात्यात केवळ एक गुण आहे. त्यांचा स्पर्धेतील पुढील प्रवास कठीण असाच दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

SCROLL FOR NEXT