Euro Cup 2024 Netherlands vs Austria Sakal
क्रीडा

Euro Cup 2024 : जिगरबाज ऑस्ट्रियाची युरो करंडकात आगेकूच; ३४ वर्षांनंतर नेदरलँड्सला नमविले

Netherlands vs Austria : मार्सेल झाबित्सर याने सामन्याच्या ८० व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे ऑस्ट्रियाने ३४ वर्षांत प्रथमच नेदरलँड्सवर मात करण्याची किमया साधली.

सकाळ वृत्तसेवा

बर्लिन : जिगरबाज ऑस्ट्रियाने जबरदस्त कामगिरी साधताना नेदरलँड्सला ३-२ असे हरविले, त्याचबरोबर माजी विजेत्या फ्रान्सलाही मागे टाकून युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात अव्वल स्थान मिळविले.

मार्सेल झाबित्सर याने सामन्याच्या ८० व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे ऑस्ट्रियाने ३४ वर्षांत प्रथमच नेदरलँड्सवर मात करण्याची किमया साधली. यापूर्वी ३० मे १९९० रोजी डच संघाविरुद्ध ऑस्ट्रियन संघ अखेरच्या वेळेस जिंकला होता.

सामन्याच्या सहाव्या मिनिटास फ्रेंच खेळाडू डॉनयेल मालेन याच्या स्वयंगोलमुळे ऑस्ट्रियाला आघाडी मिळाली होती. उत्तरार्धात नेदरलँड्सने जोरदार टक्कर दिली. कॉडी गाक्पोने ४७ व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे त्यांनी बरोबरी साधली.

नंतर रोमानो श्मिद याच्या भेदक हेडरमुळे ऑस्ट्रियाला ५९ व्या मिनिटास पुन्हा आघाडी घेणे शक्य झाले. ७५ व्या मिनिटास मेम्फिस डिपाय याच्या गोलला व्हीएआरद्वारे मंजुरी मिळाल्यानंतर नेदरलँड्सने २-२ अशी बरोबरी साधली होती.

एम्बाप्पेचा पहिला युरो करंडक गोल

डॉर्टमंड येथे फ्रान्सला पोलंडने १-१ असे गोलबरोबरीत रोखले. सामन्यातील दोन्ही गोल पेनल्टी फटक्यांवर झाले. नाकाच्या दुखापतीमुळे मागील सामन्यास मुकलेला फ्रेंच कर्णधार किलियन एम्बाप्पे नाकावर मास्क चढवून सामन्यात खेळला व त्याने ५६व्या मिनिटास संघाला आघाडी मिळवून दिली.

ऑस्ट्रियाचे गटात सर्वाधिक सहा गुण

ऑस्ट्रियाने ‘ड’ गटात दोन विजय व एका पराभवासह सहा गुण नोंदवून पहिला क्रमांक मिळविला. फ्रान्सचे एक विजय व दोन बरोबरींसह पाच गुण, तर नेदरलँड्सचे प्रत्येकी एक विजय, बरोबरी आणि पराभवामुळे चार गुण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

SCROLL FOR NEXT