euro 2024 final spain beat england fans Fighting outside the stadium Viral video sakal
क्रीडा

EURO 2024 : इंग्लंडच्या समर्थकांना पराभव जिव्हारी; स्टेडियम बाहेर स्पेनच्या फॅन्ससोबत फ्री स्टाइल तुफान हाणामारी, Viral video

युरो कप 2024 चा अंतिम सामना स्पेन आणि इंग्लंड यांच्यात जर्मनीची राजधानी बर्लिन येथे खेळला गेला.

Kiran Mahanavar

युरो कप 2024 चा अंतिम सामना स्पेन आणि इंग्लंड यांच्यात जर्मनीची राजधानी बर्लिन येथे खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहिला मिळली ज्यामध्ये शेवटी स्पेनच्या संघाने 2-1 असा सामना जिंकला आणि विजेतेपदही जिंकले. स्पेनने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. युरो कप जेतेपद सर्वाधिक म्हणजे 4 वेळा जिंकणारा देश आता बनला आहे.

स्पेनने चौथ्यांदा युरो कप जिंकला. पण, इंग्लंडचा हा सलग दुसरा युरो कप फायनल सामना होता. आणि सलग दोन फायनलमध्ये हरणारा इंग्लंड हा पहिला देश आहे. दुसऱ्या फायलनमधील हारल्यामुळे इंग्लडच्या समर्थकांना पराभव इतका जिव्हारी लागला की त्यांनी अंतिम सामन्यानंतर स्पेनच्या समर्थकांवर हल्ला केला. स्टेडियमबाहेरील रस्त्यावर स्पेन आणि इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये फ्री स्टाइल तुफान हाणामारी झाली, ज्यामध्ये अनेक चाहते जखमीही झाले.

स्पेन आणि इंग्लंड यांच्यातील युरो कप 2024 च्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या गोलसाठी 47 व्या मिनिटापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. स्पॅनिश संघाच्या निकोने पहिला गोल केला. येथून स्पेनने सामन्यात निश्चितपणे 1-0 अशी आघाडी घेतली होती, परंतु यानंतर इंग्लंडने झटपट पुनरागमन केले आणि सामन्याच्या 73व्या मिनिटाला जबरदस्त गोल केला, त्यामुळे 1-1 अशी बरोबरी झाली.

त्यानंतर इंग्लंडने अतिशय आक्रमक खेळ दाखवण्यात सुरुवात केली, त्याला प्रत्युत्तरात स्पेनचा संघही तसाच खेळ करताना दिसला आणि खेळाच्या 86व्या मिनिटाला त्यांचा अनुभवी खेळाडू ओयारझाबालने गोल करून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

90 मिनिटांचा खेळ संपल्यानंतर अतिरिक्त वेळेसाठी दिलेल्या 4 मिनिटांतही इंग्लंडचा संघ एकही गोल करण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि स्पेनने 12 वर्षांनंतर युरो कप जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT