Luka Jovic  Sakal
क्रीडा

Euro 2024: जोविचच्या भरपाई वेळेतील गोलमुळे सर्बियाची स्लोव्हेनियाविरुद्ध बरोबरी

Slovenia vs Serbia: सर्बियाने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत स्लोव्हेनियाला १-१ असे गोल बरोबरीत रोखले.

सकाळ डिजिटल टीम

Slovenia vs Serbia: बदली खेळाडू लुका जोविच याने भरपाई वेळेत केलेल्या निर्णायक गोलमुळे सर्बियाने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ‘क’ गटात गुरुवारी स्लोव्हेनियाला १-१ असे गोल बरोबरीत रोखले.

९०+५ व्या मिनिटास कॉर्नर फटक्यावर जोविच याने अचूक हेडिंग साधले आणि त्यामुळे स्लोव्हेनियाचे विजयी स्वप्न भंगले. त्यापूर्वी ६९व्या मिनिटास बचावपटू झान कार्निसनिक याने प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात वेगवान मुसंडी मारत स्लोव्हेनियास आघाडी मिळवून दिली होती.

स्लोव्हेनियाची ही सलग दुसरी बरोबरी ठरली. अगोदरच्या लढतीत डेन्मार्कविरुद्धही त्यांना १-१ गोल बरोबरीमुळे एक गुण मिळाला होता. दोन लढतीतून आता त्यांचे दोन गुण झाले आहेत.

इंग्लंडविरुद्ध एका गोलने पराभूत झालेल्या सर्बियाला बरोबरीमुळे एक गुण मिळाला. गट साखळीतील अखेरच्या लढतीत स्लोव्हेनियाचा इंग्लंडविरुद्ध सामना होईल, तर सर्बिया डेन्मार्कविरुद्ध खेळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female Aggressive:'ग्रामस्थ-वनअधिकाऱ्यांत रणकंदन'; नगर तालुक्यातील महिला आक्रमक, पकडलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारा

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी पुन्हा रंगभूमीकडे, लेक आशीचं ‘लैलाज’ नाटकातून रंगभूमीवर पदार्पण

Gold Rate Today: सोने झाले आणखी स्वस्त, चांदीचीही चमक उतरली, तुमच्या शहरात १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव काय? जाणून घ्या

अर्जुन कपूरला त्याच्या चाहत्यांनीच केलं ट्रोल!

Supreme Court: आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही; ‘स्थानिक’बाबत न्यायालयाचे निर्देश

SCROLL FOR NEXT