Euro 2024 Group B Points Table sakal
क्रीडा

Euro 2024 Group B Points Table : शेवटच्या क्षणी 'ग्रुप बी'च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ! स्पेन अन् इटली पात्र तर क्रोएशिया...

Kiran Mahanavar

Euro 2024 Points Table Group B : सध्या युरो कप 2024 चे आयोजन जर्मनीत होत आहे. लाइपझिगमधील रेड बुल एरिना येथे सोमवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात इटलीने शेवटच्या क्षणी गोल करत क्रोएशियाचा पराभव केला. त्यामुळे 'ग्रुप बी'च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. ब गटात स्पेन, इटली, क्रोएशिया आणि अल्बानिया यांचा समावेश आहे.

इटली आणि क्रोएशिया यांच्यातील या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांना पूर्वार्धात एकही गोल करता आला नाही. त्यानंतर 55व्या मिनिटाला क्रोएशियाने शामदार गोल केला. पण इटलीच्या मॅटिया झॅकग्नीने शेवटच्या मिनिटाला गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. यासह इटलीने युरो 2024 च्या शेवटच्या 16 मध्ये प्रवेश केला. आता त्याचा सामना स्वित्झर्लंडशी होणार आहे.

युरो कप 2024 'ग्रुप बी'च्या पॉइंट टेबल

युरो कप 2024 च्या गुणतालिकेबद्दल बोलायचे झाले तर, स्पेन 9 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी इटली चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. क्रोएशिया दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि अल्बेनिया स्पेनकडून 1-0 ने पराभूत झाल्यानंतर एका गुणासह गटात तळाशी आहे. त्याचबरोबर इंग्लंड, फ्रान्स आणि नेदरलँड्समध्ये टॉप-4 मध्ये स्थान मिळविण्यासाठी लढत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT