UEFA Euro 2024 Spain vs England Final sakal
क्रीडा

Euro 2024 Final Spain vs England : स्पेनला विजेतेपदाची ट्रॉफी अन् जवळपास २५० कोटी; इंग्लंडही मालामाल

Spain beat England in Final prize money स्पेन सर्वाधिक चार ( १९६४, २००८, २०१२, २०२४) युरो चषक जिंकणारा पहिला संघ ठरला.

सकाळ डिजिटल टीम

UEFA European Football Championship 2024 Spain vs England Final : स्पेनने रविवारी मध्यरात्री युरो चषक २०२४ स्पर्धेत इंग्लंडला २-१ असा पराभवाचा धक्का देताना विक्रमी चौथे जेतेपद नावावर केले. स्पेनकडून निको विलियम्स ( ४७ मि.) व मिकेल ओयारजबाल ( ८७ मि.) यांनी गोल केले, तर इंग्लंडकडून एकमेव गोल कोल पाल्मरने ( ७३ मि.) केला. या विजयासह स्पेन सर्वाधिक चार ( १९६४, २००८, २०१२, २०२४) युरो चषक जिंकणारा पहिला संघ ठरला. त्यांनी जर्मनीला ( १९७२, १९८०, १९९६) मागे टाकले.

स्पेनने २००८ व २०१२ मध्ये युरोपियन चॅम्पियनशीप आणि २०१०मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे. स्पेनने मागील तिन्ही वेळेस अंतिम फेरीत धडक दिल्यावर जेतेपद नावावर केले आहे. आजही त्यांनी चौथे जेतेपद पटकावले आणि युरो चषक व वर्ल्ड कप अशा स्पर्धांमध्ये मिळून सलग चार फायनल जिंकणारा तो पहिला युरोपियन संघ ठरला.

इंग्लंड व स्पेन हे युरोपियन चॅम्पियनशीपमध्ये दोनवेळा समोरासमोर आले आणि इंग्लंडने दोन्ही वेळेस ( १९८० मध्ये साखळी फेरीत २-१ अशा विजयानंतर, १९९६ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ ( ०-०) असा विजय मिळवला. ) बाजी मारली होती. पण, आज स्पेन वरचढ ठरला. स्पेनने युरो २०२४ मध्ये सर्वच्या सर्व ७ सामने जिंकले आणि युरो किंवा वर्ल्ड कप स्पर्धेतील एका पर्वात सर्व सामने जिंकणारा तो पहिला युरोपियन आणि जगातील दुसरा संघ ठरला आहे. ब्राझिलने २००२च्या वर्ल्ड कप स्पर्धेत हा पराक्रम केला होता.

युरो चषक २०२४ मध्ये ३०१८.९ कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव!

कशी असेल बक्षीस रकमेची विभागणी

  • सर्व सहभागी संघांना सदस्य फी म्हणून - ८६ कोटी

  • विजयासाठी - ९ कोटी

  • ड्रॉ निकालासाठी - ४.५ कोटी

  • राऊंड ऑफ १६ मध्ये जाणाऱ्या संघाला - १३.६८ कोटी

  • उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या संघाला - २२.८० कोटी

  • उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या संघाला - ३६.४८ कोटी

  • उपविजेत्या संघाला - ४५.६० कोटी

  • विजेत्या संघाला - ७२. ९६ कोटी

युरो चषक स्पर्धेत सर्व सामने जिंकून स्पेनने जवळपास २५७ कोटी रुपये कमवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT