Sanjana Ganesan and Jasprit Bumrah
Sanjana Ganesan and Jasprit Bumrah Twitter
क्रीडा

संजना-बुमराह फुटबॉल लव्हर; स्टेडियमवर जाऊन लुटला आनंद

सुशांत जाधव

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी सुट्टीचा आनंद घेत आहे. भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन या काळात एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. दोघांनी युरो कपमधील पेनल्टी शूट आउटपर्यंत गेलेला इटली आणि स्पेन यांच्यातील रंगतदार सेमी फायनलचा स्टेडियमवर जाऊन आनंद घेतला. (Euro Cup 2020 Cricketer Jasprit Bumrah And Sanjana Ganesan-watch Italy vs Spain Semi Final)

लंडन येथील वेम्बले स्टेडियमवरील उपस्थितीचा एक फोटो संजना गणेशन हिने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलाय. या फोटोत प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरु युरो कपच्या अंतिम टप्प्यातील लढतीचा लव्हली कपल आनंद घेताना दिसते.

पहिल्या सेमीफायनलमध्ये इटली आणि स्पेन यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटलेला सामना एक्स्ट्रा टाईममध्ये त्याच स्कोअरवर थांबला. त्यानंतर पेनल्टी शूट आउटमध्ये इटलीने 4-2 असा विजय नोंदवत फायनल गाठली. हा क्षण बुमराह-संजनाने याची देही याची डोळा अनुभवला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय संघाला 20 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडयातील खेळाडू लंडन तसेच इतर ठिकाणी भटकंती करत सुट्टीचा आनंद व्यक्त करत आहेत. यापूर्वी अश्विन आणि पंत यांनी देखील युरो कप स्पर्धेचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले होते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड संघाने पराभूत केले होते. जसप्रीत बुमराह प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण त्याला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले होते. टीम इंडियाचं अस्त्र असलेला बुमराह आयसीसीच्या मोठ्या सामन्यात मोक्याच्या क्षणी अपयशी ठरतो, हेच चित्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पाहायला मिळाले. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेनंतर इंग्लंडच्या ताफ्यातील 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यात 3 खेळाडूंसह 4 स्टाफ सदस्यांचा समावेश होता. या खळबळजनक वृत्तानंतर इंग्लंडच्या संघाने पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी नवा संघ मैदानात उतरलाय. यासर्व प्रकारामुळे भारतीय संघाच्या सुट्टीवर कोणताही परिणाम झालेला नाही. 14 जुलैला संघातील सर्व खेळाडू लंडनमध्ये एकत्रित येणार आहेत. कोरोना प्रोटोकॉल नुसार, यावेळी सर्व खेळाडूंची टेस्ट केली जाईल आणि पुन्हा त्यांना बायोबबलमध्ये प्रवेश देण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरुन घसरली, लोकल सेवा ठप्प! रात्रीपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत

Latest Marathi News Live Update : बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांच्या तस्करी प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक

Norway Chess Tournament : आर. प्रज्ञानंदची शानदार सुरुवात तर ; कार्ससनचा विश्वविजेत्यावर विजय

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 29 मे 2024

Rafael Nadal : आता ऑलिंपिकसाठी परत येईन,नदाल ; फ्रेंच स्पर्धेतून तंदुरुस्ती आजमावता आली

SCROLL FOR NEXT