Euro Cup 2021  Twitter
क्रीडा

Euro 2020 : उपात्यंपूर्वच्या पर्वाची उत्कंठा शिगेला

ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला बेल्जियमशी तर जर्मनीला इंग्लडशी आणि स्पेनला क्रोएशियाशी दोन हात करावे लागणार असल्याने त्यांची वाटचाल खडतर आहे.

दीपक कुपन्नावर

युरो करडंकाचा साखळी सामन्यांचा टप्पा पुर्ण झाला. ग्रुप ऑफ डेथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ गटातून गतविजेता पार्तुगाल, माजी विजेता फ्रान्स आणि जर्मनीने बाजी मारीत उपात्यंपुर्व फेरी गाठली. इटली, नेदरलँड, बेल्जियम यांनी सफाईदार खेळ करीत गटात अव्वल स्थान मिळवत आगेकूच केली. 26 पासून सुरु होणाऱ्या उपात्यंपुर्व फेरीत ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला बेल्जियमशी तर जर्मनीला इंग्लडशी आणि स्पेनला क्रोएशियाशी दोन हात करावे लागणार असल्याने त्यांची वाटचाल खडतर आहे. तुलनेत फ्रान्स, इटली यांना अनुकुल सामने असल्याने त्यांची उपात्यंफेरी निश्चित मानली जात आहे. त्यामुळेच उपात्यंपुर्व फेरीची फुटबॉल जगताला उत्कंठा लागून राहिली आहे.

कोरोनात युरो करंडक आणि कोपा अमेरिका स्पर्धेने फुटबॉल शौकिनांना दिलासा दिला आहे. युरोच्या साखळी ठप्यात सर्वाचेंच लक्ष वेधले ते फ गटातील सामन्यांनी. प्रशिक्षक लो यांच्या जर्मनीला पहिल्याच सामन्यात ह्युमेल्सच्या स्वयंगोलने पराभवाच्या खाईत लोटले. गत विश्वचषकातील साखळीतच गारद होण्याचा कटू अनुभव ताजा असताना जिगरबाज जर्मनीने इर्षेने खेळ करुन आव्हान कायम राखले.   रंगतदार सामन्यात पिछाडीवरून येत फ्रान्सला 4-2 ने मात तर शेवटच्या सामन्यात हंगेरीला 2-2 असे बरोबरीत रोखत बाजी पलटवली. जर्मनीची ड गटातील अव्वल इग्लंड विरुध्द कस लागणार आहे.

स्पर्धेत पाच गोलचा धडाका लावणारा ख्रिस्तीयानो रोनाल्डोने एकहाती तंबू लढवत पोर्तुगालला चांगल्या गोलसरासरीच्या जोरावर पुढे नेले. ब गटाचा अव्वल बेल्जियम विरुध्द रोनाल्डोच्या पोर्तुगाल आर्मीची अग्निपरिक्षा आहे. गटात सफाईदार विजय नोंदविणाऱ्या इटलीला नवोदित ऑस्ट्रियाचा अडथळा पार करावा लागणार आहे. फ्रान्सला स्वित्झलँड तर नेदरलँडला चेक प्रजासत्ताकचे कमकुवत आव्हान आहे.

संपुर्ण फुटबॉल विश्वाचा हद्यविकाराने काळजाचा ठोका चुकविणाऱ्या ख्रिस्तियनच्या डेन्मार्कने शेवटच्या सामन्यात सर्वस्वपणाला लावत किमया केली. ख्रिस्तियनसाठी सर्वकाही ही टँगलाईन घेऊन खेळणाऱ्या डेन्मार्कला वेल्सशी दोन हात करावे लागतील. चेंडूवर हुकमुत राखण्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या स्पेनने गोल नोंदविण्याचे लक्ष्य गाठले तरच क्रोएशिया विरुध्द डाळ शिजू शकेल. इ गटातील अव्वल स्वीडनचा नवख्या युक्रेनशी मुकाबला आहे.

स्वंयगोलचा पाऊस

यंदाच्या स्पर्धेत स्वयंगोलचा जणू पाऊस पडतो आहे. साखळीतच तब्बल आठ स्वयंगोल नोंदले गेले आहेत. युरोच्या इतिहासात 1976 च्या स्पर्धेत नऊ स्वयं गोलचा विक्रम आहे. यावर्षी हा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT