football sakal
क्रीडा

Football Competition : ना सेलिब्रिटी... ना राजकारणी... युरोपमध्ये खेळाचीच महती

संपूर्ण फुटबॉल क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या युरो अंतिम सामना स्पेन आणि इंग्लंड यांच्यात झाला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - एखादी सर्वात मोठी आणि लोकप्रिय खेळाची स्पर्धा किंवा अंतिम सामन्यासारखी लढत असली की लोकप्रियतेच्या वाहत्या गंगेत टीव्हीवर चमकण्यासाठी आपलेही घोडे दामटण्याची हकमिका आपल्याकडे पाहायला मिळते; पण परदेशात मात्र खेळ आणि खेळाडू हेच कॅमेरासाठी ‘फोकस’ असतात. बर्लिनमध्ये झालेला युरो करंडक स्पर्धेचा अंतिम सामना हे त्यासाठी उत्तम उदाहरण ठरले.

संपूर्ण फुटबॉल क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या युरो अंतिम सामना स्पेन आणि इंग्लंड यांच्यात झाला. प्रदीर्घ कालावधीनंतर इंग्लंडने अंतिम फेरी गाठलेली असल्यामुळे ब्रिटनची प्रतिष्ठा पणास लागली होती. अर्थात हा सामना याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी पंतप्रधान सर किथ स्टार्मर आणि प्रिन्स विल्यम्स स्टेडियममध्ये हजर होते; परंतु संपूर्ण सामन्यादरम्यान एकदाही कॅमेरा किथ स्टार्मर यांच्यावर रोखला गेला नाही. प्रिन्स विल्यम्स केवळ पारितोषिक वितरणावेळी तेही एकदाच दिसून आले.

ही घटना बर्लिनमध्ये घडली असली तरी संपूर्ण युरोपात खेळाची संस्कृती जपली जाते आणि केवळ खेळ आणि खेळाडू यांनाच प्राधान्य दिले जाते. या उलट वेगळा अनुभव भारतीय उपखंडात दिसून येतो. समोर कोणताही महत्त्वाचा सामना असला की कॅमेरा एकतर सेलिब्रिटी किंवा राजकारणी यांच्यावर वारंवार फिरवला जातो. गतवर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत हे दृष्य वारंवार दिसत होते.

महत्त्वाच्या क्षणी खेळाडूंचा आनंद किंवा जल्लोष दाखवण्याऐवजी सेलिब्रिटी-राजकारणी यांचेच चेहरे दाखवले जातात. आयपीएल ही व्यावसायिक स्पर्धा आहे; परंतु अधिकृत आंतरराष्ट्रीय सामने-स्पर्धा असल्या तरी त्या अपवाद ठरत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT