Mirabai Chanu
Mirabai Chanu sakal
क्रीडा

रिओतील अपयशानेच टोकियो यशाचा पाया

सकाळ वृत्तसेवा

मीराबाई चानू हिने ऑलिंपिक वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकल्यामुळे कठोर मेहनत, एखाद्या लक्ष्यासाठी सर्व काही देण्याची तयारी असली की यश मिळते हा विश्वास दृढ होण्यास मदत होईल. रिओ स्पर्धेतील अपयशामुळे चानू निराश होती, मात्र याच अपयशामुळे तिला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित केले. जागतिक विजेतेपद जिंकल्यावरही ती समाधानी नव्हती. रिओतील अपयश टोकियोतील पदकच पुसून काढेल या जिद्दीने ती तयारी करीत होती आणि त्याचे यश तिला मिळाले.

मीराबाई किती कसून सराव करते. त्यासाठी स्वतःला किती झोकून देते, ते ऐकले होते, ते अनुभवताही आले. दिल्लीत कडक लॉकडाउनमुळे तिला मुंबईतील महालक्ष्मी येथील पश्चिम रेल्वेच्या स्टेडियममध्ये सरावासाठी सुविधा देण्यात आली. त्या दोन महिन्यांत तिने कधीही मला बाहेर जायचे आहे हे सांगितले नाही. पतियाळात सराव करीत असताना एका रूममध्ये कोंडून घ्यावे लागले होते, पण त्यावेळीही मार्गदर्शक विजय शर्मा यांच्या सूचनांचे ती व्हिडीओ कॉलवरून पालन करीत होती.

ती रोज पाच ते सहा तास सराव करीत होती. कधीही सरावात सूट मागितली नाही किंवा आज त्रास होत असल्याने सराव कमी करते, असे सांगितले नाही. ठरलेला आहार घेत होती. आत्ताही आपल्यासमोर नेमके आव्हान काय आहे याची तिला पूर्ण जाणीव होती. तिने आशियाई स्पर्धेत क्लीन अँड जर्कमध्ये ११९ किलो वजन उचलण्याचा विक्रम केला होता. मात्र ऑलिंपिक स्पर्धा वेगळी असते. त्याचे दडपण खूप जास्त असते. त्यावेळी एखादी चूक झाली तरी ती महागात पडते हे ती जाणून होते, त्यामुळेच आपले रौप्य पदक निश्चित आहे, हे कळल्यावरच तिने ऑलिंपिक विक्रम करण्याचा प्रयत्न केला. तिने सरावात नक्कीच यापेक्षा जास्त वजन अनेकदा उचलले असेल, पण स्पर्धेत तेच वजन अवघड होते. ऑलिंपिकमध्ये, आंतरराष्ट्रीय स्पर्धात तेच कस पाहते. त्यासाठी हवा असलेला संयम तिच्याकडे आहे, तसेच चिकाटीही. गेल्या तीन वर्षांत ती फार तर तीन-चार वेळाच घरी गेली असेल. लक्ष्यपूर्तीचा आनंद तिच्याइतका कोणालाच असू शकत नाही.

-पोन्नुस्वामी रंगास्वामी

(लेखक १९९२ च्या ऑलिंपिक क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धेत खेळले होते, तसेच १९९० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT